Next
आयडियातर्फे फीचर फोन्सवर कॅशबॅक ऑफर
प्रेस रिलीज
Tuesday, June 05, 2018 | 05:02 PM
15 0 0
Share this story

पुणेः आयडिया सेल्युलर या प्रमुख टेलिकॉम कंपनीने महाराष्ट्र व गोव्यामधील त्यांच्या जवळपास तीन कोटी ग्राहकांच्या विविध गरजा लक्षात घेत फोर जी  ग्राहकांसाठी क्रांतिकारी व्हीओएलटीई (VOLTE) सेवा सुरू केली आहे; तसेच मोठ्या संख्येने टू जी सेवेचा वापर करणार्यास ग्राहकांसाठी नोकिया फीचर फोन्सवर आकर्षक कॅशबॅक ऑफरचीही घोषणा केली आहे.

व्हीओएलटीई (VOLTE)  तंत्रज्ञानाच्या वापरामुळे फोनवर बोलणार्यांचचा आवाज सर्वसामान्य कॉल्समध्ये ऐकू येणार्याा आवाजाच्या तुलनेत अधिक सुस्पष्टपणे ऐकायला येतो. ही सेवा कमीत कमी वेळात कॉल जोडून देते आणि बॅटरीचा अधिक चांगला उपयोग करते. आयडिया ग्राहकांनी आपल्या फोनवरून केलेल्या पहिल्या व्हीओएलटीइ कॉलनंतर ४८ तासांत त्यांना मोफत दहा जीबी डेटाची भेट मिळणार आहे.

याबाबत अधिक माहिती देताना आयडिया सेल्युलरचे चीफ मार्केटिंग ऑफिसर शशी शंकर म्हणाले, ‘आयडिया व्हीओएलटीई (VOLTE)  सेवेची सुरूवात म्हणजे डिजिटल माध्यमांनी जोडलेल्या ग्राहकांप्रती आम्ही जपलेल्या बांधिलकीचे मूर्त रूप आहे. मोबिलिटीच्या क्षेत्रातल्या आमच्या प्रवासातील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या नव्या क्रांतीकारी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आमच्या ग्राहकांना कॉल करण्याचा अधिक चांगल्या दर्जाचा आणि समृद्ध अनुभव देण्याचे आमचे लक्ष्य आहे.’

ते पुढे म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने टू जी सेवेचा वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी आयडियाने नोकिया फिचर फोन्सवर आकर्षक कॅशबॅक ऑफर देऊ केली आहे. नोकिया १०५, नोकिया १३० आणि नोकिया १५० हे फिचर फोन्स विकत घेणाऱ्या सर्व आयडिया ग्राहकांना खरेदीनंतरच्या १२ महिन्यांच्या कालावधीत सहाशे रुपयांपर्यंत कॅशबॅक देण्यात येणार आहे. ही ऑफर सर्व नवीन व विद्यमान ग्राहकांसाठी ३१ जुलैपर्यंत वैध आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link