Next
पं. श्रीकांत देशपांडे यांच्या स्मरणार्थ ‘संगीत संध्या’
BOI
Thursday, May 30, 2019 | 02:52 PM
15 0 0
Share this article:

पं. श्रीकांत देशपांडेपुणे : सवाई गंधर्वांचे नातू व भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ शिष्य व गायक पं. श्रीकांत देशपांडे यांच्या स्मरणार्थ ‘संगीत संध्या’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या पत्नी शीला देशपांडे व पं. श्रीकांत देशपांडे मित्रमंडळ यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. 

‘येत्या गुरुवारी, सहा जून २०१९ रोजी सायंकाळी पाच वाजता कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे हा कार्यक्रम होणार आहे,’ अशी माहिती पं. देशपांडे यांच्या पत्नी शीला देशपांडे यांनी दिली. 

कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर प्रवेश देण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिका शनिवार, एक जूनपासून यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासमोरील नावडीकर म्युझिकल्स येथे उपलब्ध असतील.

पं. रघुनंदन पणशीकर
‘महोत्सवाचे हे नववे वर्ष असून, एक नवोदित कलाकार व एक ज्येष्ठ कलाकार या ‘संगीत संध्ये’त पं. देशपांडे यांना स्वरांजली अपर्ण करतील. यंदा पंडिता पद्मा तळवलकर यांच्या शिष्या यशस्वी सरपोतदार व गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे ज्येष्ठ शिष्य पं. रघुनंदन पणशीकर यांच्या गायनाचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. त्यांना रोहित मुजुमदार व भरत कामत यांची तबल्याची, तर सुयोग कुंडलकर यांची संवादिनीची साथसंगत असणार आहे. रवींद्र खरे यांच्या निवेदनातून पं. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे,’ असेही शीला देशपांडे यांनी सांगितले.

यशस्वी सरपोतदार
पं. देशपांडे यांची दि. १२ जून रोजी जयंती असते. त्यानिमित्त दरवर्षी जून महिन्यात या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यात आतापर्यंत ज्येष्ठ गायिका पंडिता प्रभा अत्रे, अश्विनी भिडे, पं. उल्हास कशाळकर, पं. उपेंद्र भट, व्यंकटेश कुमार, गणपती भट, चंद्रशेखर वझे, कलापिनी कोमकली, संजय गरुड, सुधाकर चव्हाण आदी यांनी सहभाग घेतला आहे.

‘पं. देशपांडे यांचे गायनावर आणि कलाकारांवर फार प्रेम होते. नवीन कलाकारांना व्यासपीठ मिळावे, नाव मिळावे म्हणून ते कायमच प्रयत्नशील असत. म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ होणाऱ्या या कार्यक्रमात आम्ही कोणत्याही विशिष्ट घराण्याचे बंधन न ठेवता सर्वांचेच स्वागत करतो,’असेही शीला देशपांडे यांनी नमूद केले.

कार्यक्रमाविषयी :
प.श्रीकांत देशपांडे संगीत संध्या 
स्थळ : यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड
दिवस व वेळ : गुरुवार, सहा जून, संध्याकाळी पाच वाजता.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search