Next
‘महसूल विभागाने लोकाभिमुख काम केले पाहिजे’
महसूल उपायुक्त सिद्धाराम सालीमठ यांचे प्रतिपादन
BOI
Saturday, August 03, 2019 | 01:10 PM
15 0 0
Share this article:


नवी मुंबई : ‘संपूर्ण शासनाची प्रतिमा महसूल विभागाच्या कामकाजावर अवलंबून असते. महसूल प्रशासन शासनाचा कणा आहे. नागरिकांच्या प्रशासनाकडून अपेक्षा आहेत. म्हणूनच महसूल विभागाने लोकाभिमुख काम केले पाहिजे’, असे प्रतिपादन महसूल उपायुक्त सिद्धाराम सालीमठ यांनी केले.

महसूल दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयातील बैठक कक्षात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सर्व उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना गुलाब पुष्प देऊन महसूल दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमास पुरवठा उपायुक्त शिवाजी कादबाने, नियोजन उपायुक्त बा. ना. सबनीस, पुनर्वसन उपायुक्त अरुण अभंग, मावक उपजिल्हाधिकारी तुषार मठकर, भूसंपादन उपजिल्हाधिकारी अभय करगुटकर आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन तहसिलदार संदिप चव्हाण व प्रितीलता कौरथी यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसिलदार माधुरी डोंगरे यांनी केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search