Next
खजूर-राजगिरा पराठा
BOI
Saturday, August 05, 2017 | 09:45 AM
15 0 0
Share this article:

खजूर-राजगिरा पराठा

खजूर पौष्टिक असतात. त्यात भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. खजूर खाल्ल्याने ऊर्जा मिळते. तसेच राजगिरा हा भारतात मुबलक प्रमाणात उपलब्ध होणारा पदार्थ आहे. फक्त उपवासाच्या निमित्तानेच राजगिऱ्याचे लाडू, वड्या खाल्ल्या जातात. परंतु या पौष्टिक पदार्थाला रोजच्या स्वयंपाकात स्थान नसते. म्हणूनच ‘पौष्टिक डब्याची चविष्ट रेसिपी’ या सदरात आपण आज पाहणार आहोत खजूर-राजगिरा पराठा...
...................

खजूरआपण खात असलेल्या प्रत्येक गोष्टीत काही ना काही गुणधर्म असतातच. मग त्या रोजच्या जेवणातील भाज्या असोत किंवा सुक्या मेव्यातील काही पदार्थ. असाच एक घटक म्हणजे खजूर. मुळात गोड स्वाद असलेले खजूर आतून काहीसे कमी गोड लागतात. सर्वांनाच खजूर फार आवडतात असे नाही. परंतु खजूर पौष्टिक असतात. यात भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. खजुरांच्या सेवनाने उर्जा मिळते. त्यामुळे लोहाची कमतरता भरून निघते. त्यामुळे पोटाच्या तक्रारींवर खजूर हे रामबाण औषध ठरू शकते. खजुरांमुळे पचनशक्तीही वाढते.

राजगिराराजगिरा, ओट्स, तांदूळ, ज्वारी, नाचणी, हरभरा डाळ हे घटकही आजच्या रेसिपीत समाविष्ट आहेत. यापैकी प्रत्येकामध्ये पौष्टिक घटक आहेत, जे मुलांच्या वाढीसाठी आवश्यक असतात. राजगिऱ्यात प्रथिने, अ जीवनसत्त्व, कॅल्शियम, लोहखनिज मुबलक असते. रोजच्या स्वयंपाकात कणकेच्या पोळ्या लागतातच. त्या कणकेत राजगिरा पीठ घातलं, तर पोळ्या अधिक पौष्टिक होतील. 

साहित्य :
गव्हाचे पीठ – दीड किलो, राजगिरा, ओटस्, ज्वारी, नाचणी, तांदूळ, हरभरा डाळ यांचे पीठ - सर्व मिळून अर्धा किलो (राजगिरा थोडा जास्त घेतला तरीही चालेल), खजूर – २०, तेल (मोहन घालण्यासाठी), थोडेसे दूध 


कृती : 
- सर्वप्रथम खजुरांमधील बिया काढून घ्या.
- त्यानंतर खजूर मिक्सरने बारीक करून घ्या.
- कणीक आणि इतर धान्यांची पिठे घेताना ती प्रमाणात घ्या. 
- साधारण पोळी (पराठा) लाटता येईल इतक्या प्रमाणात गव्हाचे पीठ असावे.  
- ही सर्व पिठे एकत्रित करून घ्या. 
- बारीक केलेले खजूर या पिठांमध्ये व्यवस्थित मिसळून घ्या.
- या मिश्रणाची पोळ्यांसाठी लागते तशी कणीक मळून घ्या. शक्यतो ही कणिक दूध घालून मळली, तर पराठे आणखी मऊ होऊ शकतात.      
- या कणकीचे छोटे छोटे पराठे बनवून ते शक्यतो लोखंडी तव्यावर भाजून घ्या.
- चिंच-गुळाच्या चटणीसोबत हे पराठे छान लागतात.

- डॉ. वृंदा कार्येकर 
मोबाइल : ९४०५४ ३०१६४  
ई-मेल : kvvrunda@gmail.com

(लेखिका पुण्यातील स्त्रीरोगतज्ज्ञ असून होलिस्टिक हेल्थ कन्सल्टंट आहेत)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Anupreeti About
Mast
1
0

Select Language
Share Link
 
Search