Next
पुण्यात नऊ डिसेंबरला ज्योतिषी संमेलन
प्रेस रिलीज
Wednesday, December 05, 2018 | 03:10 PM
15 0 0
Share this article:

पुणे : गुरुकुल विश्वपीठातर्फे नऊ डिसेंबर २०१८ रोजी पुण्यात अखिल भारतीय ज्योतिषी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन मौलाना आझाद सभागृह (कोरेगाव पार्क) येथे सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत होईल,’ अशी माहिती संयोजन समितीच्या वतीने डॉ. अजयचंद्र भागवत गुरुजी यांनी दिली.

ज्येष्ठ कवयित्री व ज्योतिष अभ्यासक प्रतिभा शाहू मोडक, ज्योतिष विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश्वर मारटकर, गुरुकुल विश्वपीठाचे संस्थापक डॉ. अजयचंद्र भागवत गुरुजी, संयोजक पल्लवी भागवत यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. सिद्धेश्वर मारटकर हे उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील. समारोप पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. समारोप सत्राला महापौर मुक्ता टिळक, आमदार जगदीश मुळीक उपस्थित राहणार आहेत.

संमेलनात उद्घाटन सत्रानंतर ज्योतिष विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मारटकर २०१९ च्या निवडणुकीवर ज्योतिष अंगाने भाकितावर प्रकाश टाकणार आहेत. नवीन तंत्रज्ञान आणि ज्योतिष, ‘थिंक लॉजिकली, अप्लाय अॅस्ट्रोलॉजीकली’, दैनंदिन जीवनातील अडचणी आणि ज्योतिष, हस्ताक्षर आणि ज्योतिष, नक्षत्र आणि ज्योतिष, नवे ग्रह आणि त्यांचा मानवी जीवनावरील प्रभाव अशा अनेक विषयांवर व्याख्यान सत्रे या संमेलनात होणार आहेत.

ज्योतिष क्षेत्रातील व. दा. भट, नंदकिशोर जकातदार, डॉ. मधुसूदन घाणेकर, विजय जकातदार, सुनील मावळे, आरती घाटपांडे, डॉ. श्रीहृदय भागवत, रजनी साबदे आदी मान्यवर विविध व्याख्यान सत्रांत मार्गदर्शन करणार आहेत. त्याचप्रमाणे ज्योतिष क्षेत्रात लक्षणीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना जीवन गौरव प्रदान, पुस्तक प्रकाशन असे अनेक कार्यक्रम या संमेलनात होणार आहेत.  

संमेलनाविषयी :
दिवस :
रविवार, नऊ डिसेंबर २०१८
वेळ : सकाळी सकाळी १० ते सायंकाळी पाच
स्थळ : मौलाना आझाद सभागृह, कोरेगाव पार्क, पुणे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal Gramopadhye About 17 Hours ago
Please let us know their forecast about the results of the election .
0
0

Select Language
Share Link
 
Search