Next
मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँकेस सहा कोटींचा नफा
प्रेस रिलीज
Monday, September 17 | 11:18 AM
15 0 0
Share this story

पुणे : मुस्लीम को-ऑपरेटिव्ह बँकेला चालू आर्थिक वर्षात सहा कोटी ११ लाखांचा नफा झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांनी दिली.
बँकेची ८६ वी सर्वसाधारण सभा आझम कँपसमधील  असेंब्ली हॉल येथे रविवारी (१६ सप्टेंबर) सकाळी साडेदहा वाजता झाली. या सभेत बँकेचे अध्यक्ष डॉ. इनामदार यांनी बँकेच्या प्रगतीची माहिती दिली.

ते म्हणाले, ‘बॅंकेकडे ५६७ कोटी ६० लाखांच्या ठेवी असून, ३४५ कोटी ७२ लाखांचे कर्जवाटप केले आहे. बँकेचा एनपीए ८.४५ टक्के आहे. १९१७-१८ या आर्थिक वर्षात बँकेला सहा कोटी ११ लाख रुपयांचा फायदा झाला आहे. पुण्यात मुख्यालय असलेल्या मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँकेच्या २७ शाखा असून, २४ शाखांच्या विस्ताराची परवानगी रिझर्व्ह बँकेकडे मागण्यात आली आहे. त्याचबरोबर मोबाइल बँकिंग अॅप, आरटीजीएस-एनईएफटी गो लाइव्ह या डिजिटल बँकिंग सेवा देण्यात आल्या असून, भावी काळात नेट बँकिंग, परकीय चलन विनिमय सेवा दिल्या जाणार आहेत.’

बँकेचे संचालक, सभासद, कर्मचारी या सर्वसाधारण सभेस उपस्थित होते. सभेनंतर सहकार आणि बॅंकिंग प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. बँकेचे अध्यक्ष डॉ. इनामदार, सचिव डॉ. हारुन सय्यद यांनी अहवाल मांडला. त्याला सभासदांनी मंजुरी दिली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link