Next
‘आंत्रप्रेन्युअर्स इंटरनॅशनल’तर्फे उद्योजकता दिवस साजरा
प्रेस रिलीज
Tuesday, July 31 | 03:40 PM
15 0 0
Share this story

‘आंत्रप्रेन्युअर्स इंटरनॅशनल’तर्फे आयोजित ‘उद्योजकता दिवस’ कार्यक्रमात पुरस्कारार्थींसह ‘क्विकहील टेक्नोलॉजीज’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास काटकर, आंत्रप्रेन्युअर्स इंटरनॅशनलचे अध्यक्ष चंद्रशेखर भावे, सचिव मिलिंद जोशी, खजिनदार अतुल कुलकर्णी आदी

पुणे : ‘आंत्रप्रेन्युअर्स इंटरनॅशनल’तर्फे (ईआय) नुकताच भारतरत्न जेआरडी टाटा यांच्या जयंतीनिमित्त ‘उद्योजकता दिवस’ साजरा करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ‘क्विकहील टेक्नोलॉजीज’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास काटकर उपस्थित होते. आंत्रप्रेन्युअर्स इंटरनॅशनलचे अध्यक्ष चंद्रशेखर भावे, सचिव मिलिंद जोशी, खजिनदार अतुल कुलकर्णी, आंत्रप्रेन्युअर्स इंटरनॅशनलचे संस्थापक बाळ पाटील आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. 

या वेळी एमई एनर्जी प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक के. विजयासंकर कार्था यांना ‘एक्सलन्स इन आंत्रप्रेन्युअरशिप पुरस्कार, तर फ्रिक्शन वेल्डींग टेक्नोलॉजीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यतीन तांबे आणि टॉक्स इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वसंत नरके यांना ‘एक्सलन्स इन आंत्रप्रेन्युअरशिप इन सर्व्हिस इंडस्ट्री’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘असोसिएशन ऑफ पेरेंटस ऑफ मेंटली रिटार्डेड चिल्ड्रन,ठाणे’चे अध्यक्ष विश्वास गोरे यांना ‘अॅवॉर्ड फॉर आंत्रप्रेन्युअरशिप विथ सोशल रिलेव्हन्स’, देआसरा फाउंडेशनला ‘ऑर्गनायझेशन सर्पोटींग आंत्रप्रेन्युअर्स’ पुरस्कार आणि प्रकाश रत्नपारखी यांना ‘स्पेशल रेकगनिशन’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या वेळी ईआयचे पुरस्कार विजेते आणि आंत्रप्रेन्युअर क्लबचे काही काळ सदस्य असलेले कैलास काटकर यांनी केलेली उद्योगातील यशस्वी वाटचाल मुलाखतीद्वारे जाणून घेण्यात आली. दत्ता देशपांडे यांनी काटकर यांची मुलाखत घेतली.

या कार्यक्रमाला पुणे, पिंपरी, चिंचवड, निगडी व बारामती येथील आंत्रप्रेन्युअर क्लबचे सदस्य व आधीचे पुरस्कार विजेते उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link