Next
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा
BOI
Friday, September 06, 2019 | 05:48 PM
15 0 0
Share this article:

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात शिक्षकदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी डॉ. शोभा इंगवले, डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांच्यासह विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग

पुणे : औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात गुरुवार, पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून शाहू कॉलेजच्या माजी प्राचार्या डॉ. शोभा इंगवले उपस्थित होत्या, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे होते. 

‘विद्यार्थ्यांनी एखादे ध्येय डोळ्यासमोर ठेवून शिक्षण घ्यायला हवे; तसेच शिक्षकाने विद्यार्थ्यांना मूल्याधिष्ठित आणि चौकटीबाहेरचे ज्ञानदेखील द्यायला हवे,’ असे मत डॉ. इंगवले यांनी व्यक्त केले.

‘जो शिक्षक समाजाची वैचारिक उंची वाढवितो अशा शिक्षकांचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे. शिक्षणापासून आणि ज्ञानापासून वंचित असणाऱ्या समाजाला माणूस म्हणून उभे करण्याचा प्रयत्न शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी केला. त्यांच्या महान कार्याचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे,’ असे मत डॉ. मेनकुदळे यांनी व्यक्त केले.

पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थी शिक्षकांचा, तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर सेवकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. सुहास निंबाळकर यांनी केले. प्रा. नलिनी पाचर्णे यांनी आभार मनाले, तर सूत्रसंचालन डॉ. सविता पाटील यांनी केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search