Next
मराठी ब्राह्मण व्यावसायिक मित्रमंडळातर्फे फन-फूड महोत्सव
प्रेस रिलीज
Thursday, January 10, 2019 | 05:46 PM
15 0 0
Share this story

पत्रकार परिषदेत माहिती देताना सूर्यकांत पाठक. शेजारी डावीकडून माधव गोडबोले, संजय जोशी व राहुल कुलकर्णी.

पुणे : ‘पुण्यातील मराठी ब्राह्मण व्यावसायिक मित्रमंडळातर्फे ‘भारी भरारी २०१९’ या तीन दिवसीय फन-फूड महोत्सवाचे आयोजन केले आहे. हा महोत्सव ११ ते १३ जानेवारी २०१९ यादरम्यान डीपी रस्त्यावरील शुभारंभ लॉन्स येथे सकाळी १० ते रात्री १० या वेळेत भरेल. यात पुणेकर खवैय्यांना महाराष्ट्रीय खाद्यांची चव चाखता येणार असून, शंभरपेक्षा जास्त पानांचे प्रकार आणि इतर अनेक पदार्थ व वस्तूंची रेलचेल असणार आहे,’ अशी माहिती मराठी ब्राह्मण व्यावसायिक मित्रमंडळाचे अध्यक्ष संजय जोशी यांनी दिली.

या प्रसंगी ग्राहक पेठेचे संचालक व मित्रमंडळाचे सल्लागार सूर्यकांत पाठक, सचिव प्रसाद पटवर्धन, विश्वस्त राहुल कुलकर्णी, माधव गोडबोले आदी उपस्थित होते.

महोत्सवाचे उद्घाटन ११ जानेवारीला सकाळी ११ वाजता ‘केप्र’ मसालेच्या अरुणा भट व ‘पीएनजी’च्या वैशाली गाडगीळ यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्रभरातून चवदार खाद्यपदार्थ, गृहसजावटीच्या वस्तू, हस्तकला, रेडिमेड पदार्थ, वधु-वर सूचक, फॅशन फोटोग्राफी, कोकणी पदार्थ, डिझायनर ड्रेसेस, हर्बल प्रॉडक्ट्स, आयुर्वेदिक औषधे असे विविध प्रकारचे स्टॉल्स असणार आहेत. लहानांसाठी खेळ, गृहिणींसाठी मेहंदी, टॅटू असणार आहे. नवीन वर्षातील या खाद्य जत्रेसह ग्राहकांना गेम्स आणि शॉपिंगचा आनंद घेता येईल.

कोल्हापुरी मिसळ, कटवडा, नागपुरी वडाभात, पुडाची वडी, खानदेशी शेवभाजी, कोकणी बिरड्याची उसळ, काळ्या रस्याची उसळ, घावन, विविध प्रकारची थालीपीठे, विविध प्रकारचे मोदक, गुळपोळी, पुरणपोळी, खवापोळी अशा असंख्य पदार्थांची चव पुणेकरांना चाखता येईल. रोज संध्याकाळी चैताली माजगावकर-भंडारी यांचा धम्माल हास्य व पपेट शोचा कार्यक्रम रसिकांना पाहता येणार आहे. लहानांपासून प्रौढांपर्यंत सर्वांचे मनोरंजन व एकाच ठिकाणी एकाच वेळी खाद्ययात्रा, शॉपिंग आणि धम्माल गेम्स अनुभव येणार आहेत. महोत्सवात २०० आसपास स्टॉल्स असणार आहेत.

महोत्सवाविषयी :
कालावधी :
११ ते १३ जानेवारी २०१९
वेळ : सकाळी १० ते रात्री १०
उद्घाटन : शुक्रवार, ११ जानेवारी २०१९
वेळ : सकाळी ११ वाजता
स्थळ : शुभारंभ लॉन्स, डीपी रस्ता, पुणे
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link