Next
महापालिका अभियंता संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
प्रेस रिलीज
Tuesday, January 02, 2018 | 05:58 PM
15 0 0
Share this article:

पुणे महानगरपालिका अभियंता संघातर्फे अभियंता संघ दिनदर्शिका प्रकाशनवेळी डावीकडून मुकुंद बर्वे, संजय पोळ, सिमरन पिरजादे, सुनिल कदम, कुणाल कुमार, सुरेश जगताप, सुधीर जाधव.पुणे : ‘महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांची सखोल व सचित्र माहिती असलेल्या या दिनदर्शिकेत प्रकल्पावर काम करणार्‍या अभियंत्यांची माहिती असल्यामुळे ही दिनदर्शिका मार्गदर्शक ठरेल,’ असे मत पुणे महानगरपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी व्यक्त केले.

पुणे महानगरपालिका अभियंता संघातर्फे छापलेल्या ‘अभियंता संघ दिनदर्शिका’चे प्रकाशन कुणाल कुमार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी पालिकेचे सहआयुक्त सुरेश जगताप, संघाचे सचिव सुनील कदम, पदाधिकारी मुकुंद बर्वे, संजय पोळ, सिमरन पिरजादे, सुधीर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. पालिकेच्या विविध प्रकल्पांची सखोल माहिती असलेल्या या दिनदर्शिकेचे आयुक्तांनी कौतुक केले.

कदम म्हणाले, ‘चौदा वर्षांपासून दिनदर्शिका प्रकाशित केली जात आहे. महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणार्‍या निरनिराळ्या प्रकल्पांची सचित्र माहिती यामध्ये असते; तसेच कोणत्या प्रकल्पावर कोणता अभियंत्याने काम केले, याबाबतही माहिती दिली जाते. अभियंत्याच्या कामाची दखल घेण्यासाठी तसेच त्यांना चांगल्या कामासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ही दिनदर्शिका उपयुक्त ठरत आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search