Next
कुस्तीपटू उत्कर्ष काळे यांचा डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाकडून सन्मान
BOI
Saturday, July 20, 2019 | 05:13 PM
15 0 0
Share this article:

कुस्तीपटू उत्कर्ष काळे यांचा  सन्मान करताना महाविद्यालयाचे ट्रस्टी कोषाध्यक्ष डॉ. यशराज पाटील व डॉ. जे. एस. भवाळकर, कर्नल डॉ. दीप शर्मा, डॉ. करुणा दत्ता आदी

पिंपरी : डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थीरोग व क्रीडा चिकित्सा विभागाच्यावतीने क्रीडा चिकित्सा विषयावर एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त व ‘कॉमनवेल्थ गेम्स २०१७’मधील सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू उत्कर्ष काळे यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी महाविद्यालयाचे ट्रस्टी कोषाध्यक्ष डॉ. यशराज पाटील, अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर, आर्म फोर्स मेडिकल महाविद्यालयाचे प्राध्यापक कर्नल डॉ. दीप शर्मा, प्राध्यापिका डॉ. करुणा दत्ता आदी उपस्थित होते.

कुस्तीपटू उत्कर्ष काळे यांनी खडतर परिस्थितीवर मात करून कुस्तीला नवे स्थान निर्माण करून दिले आहे. त्यांच्या यशस्वी कारकीर्दीचा आढावा डॉ. डी. एस. भामरे यांनी घेतला. डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या अस्थीरोग विभागामध्ये क्रीडा चिकित्सा बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला असून, खेळाडूंनी याचा फायदा घ्यावा, असे आवाहन या वेळी डॉ. भामरे यांनी केले.

क्रीडा चिकीत्सा विषयक परिसंवादात खेळाडूचा आहार, व्यायाम, दिनचर्या, भौतिकोपचार, व्याधी, दुखापती, तपासण्या, योग्य उपचार, प्रतिबंधात्मक उपाययोजना, परीक्षण, क्रीडा सराव आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. विविध तज्ज्ञांनी या वेळी मार्गदर्शन केले. यामध्ये डॉ. डी. एस. भामरे, डॉ. बासू, डॉ. आलोक देवधर, डॉ. सुयश भंडारी, कर्नल. डॉ. दीप शर्मा, डॉ. उर्वशी शर्मा यांनी मार्गदर्शन केले. कुलपती डॉ. पी. डी. पाटील व उपाध्यक्षा भाग्यश्री पाटील यांचा मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search