Next
‘युएसए’ आणि भारतीय विद्यार्थ्यांची सामूहिक कार्यशाळा
प्रेस रिलीज
Monday, June 18, 2018 | 01:44 PM
15 0 0
Share this story

पुणे : पुराणिक फाउंडेशनतर्फे राबविण्यात आलेल्या अनोख्या उपक्रमाअंतर्गत येथील समर्थगड येथे ‘युएसए’ आणि भारतीय विद्यार्थ्यांची सामूहिक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

महाराष्ट्रातील वंचित मुलांना शिक्षण मिळावे या उद्देशाने २००३ साली पुराणिक फाउंडेशनची स्थापना करण्यात आली होती. सौ. पुराणिक ऊर्फ ममाजी यांनी पुण्यात २४ एकरच्या जागेत व्हिजन इंटरनॅशनल लर्निंग सेंटर या रेसिडेंशियल शाळेची स्थापना केली आणि त्याला ‘समर्थगड’ असे नाव दिले. आजच्या घडीला या सेंटरमध्ये ८० मुले आहेत. या सर्व मुलांचा विकास व्हावा म्हणून इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषा शिकविण्यासाठी तज्ज्ञ शिक्षक कार्यरत आहेत. या शिक्षणपद्धतीमध्ये दैनंदिन गोष्टीही शिकविल्या जातात, तसेच या मुलांची उत्तम ऑर्केस्ट्रा आणि खेळाडूंची टीमदेखील आहे.
 
पुराणिक फाउंडेशनचे मुख्यालय हॉस्टन (युएसए) येथे आहे. आंतरराष्ट्रीय शिक्षणाच्या संधी, योगा, अध्यात्म यांसारख्या संधी उपलब्ध करत २००० सालापासून पुराणिक फाउंडेशनच्या संस्थापक सौ. पुराणिक वंचित मुलांचे आयुष्य, शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. श्री. पुराणिक तेल आणि गॅसचा व्यापार करत असून, वर्ल्डवाइड ऑइलफील्ड मशीन (डब्लूओएम) नावाची बहुराष्ट्रीय संस्था चालवतात. पुराणिक घराण्याच्या तीनही पिढ्या या फाउंडेशनचे काम बघतात.

इम्पॅक्ट इंडिया हा प्रोग्राम अमेरिकेतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आला. यात विदेशी विद्यार्थ्यांना समर्थगड येथे राहायला येऊन विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याच्या संधी मिळतात. विदेशात देखील भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून  पुराणिक फाउंडेशनने १० दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. भारतीय सण, संस्कृती, लोकनृत्य, कला, भाषा यांसारख्या कित्येक बाबींशी ओळख करून देण्याचा मानस पुराणिक फाउंडेशनचा आहे.

व्हिजन इंटरनॅशनलने भारतीय आणि अमेरिकेतील विद्यार्थ्यांचे सामुहिक १० दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. यातून एकमेकांकडून किती शिकण्यासारखे आहे त्याचबरोबर आपण किती जवळ येऊ शकतो, आपल्यात कसे सामंजस्य घडवून आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचा फायदा होऊ शकतो हे दाखविण्याचा पुराणिक फाउंडेशनचा उद्देश आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link