Next
अॅक्सिस बँकेची नवी शाखा वसईत
प्रेस रिलीज
Thursday, August 03 | 03:21 PM
15 0 0
Share this story

ठाणे : अॅक्सिस बँक या भारतातील सर्वांत मोठ्या खासगी बँकेच्या वसई येथील नव्या शाखेचे उद्घाटन एक ऑगस्ट रोजी बँकेचे मुंबई सर्कल हेड प्रदीप अगरवाल यांच्या हस्ते झाले. या शाखेत ठेवी, कर्ज, बचत आणि चालू खाती, तसेच लॉकर सुविधा उपलब्ध आहे. या शाखेद्वारे सर्व प्रकारचे बँक व्यवहार केले जातील आणि ग्राहकांच्या विशेष गरजा पूर्ण केल्या जातील. या शाखेत संपूर्ण बँक उत्पादनांची श्रेणी आणि रिटेल, सांस्थिक व ग्राहक कर्जे अशा सर्व वित्तीय सेवा दिल्या जातील, असे कळवण्यात आले आहे. 

या वेळी  अॅक्सिस बँकेच्या शाखा बँक सेवांचे प्रमुख संजय सिलास म्हणाले, ‘महाराष्ट्रातील बँक सेवा आणि उत्पादने यांची वाढती मागणी पाहता बँक सेवांमध्ये विस्तार व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. अधिक चांगली बँक सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. संगणकसुलभ आणि ग्राहकाभिमुख सेवा आम्ही देत आहोत.’

अॅक्सिस बँक कॅशलेस व्यवहारांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा संपूर्ण देशभरात देते. बँकेच्या ‘क्यूआर’वर आधारित स्कॅनिंग उपाययोजना म्हणजेच एक चांगले डिजिटल व्यासपीठ आहे. कॅशलेस व्यवहार करण्यासाठी, लहान तिकीट व्हेंडरसाठी हे जास्त उपयुक्त असे व्यासपीठ आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link