Next
‘अँग्लो उर्दू’च्या ४० विद्यार्थ्यांचे ‘जेईई’ परीक्षेत यश
प्रेस रिलीज
Friday, May 03, 2019 | 01:21 PM
15 0 0
Share this article:

पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटिन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीच्या अँग्लो उर्दू बॉइज हायस्कूल (आझम कॅंपस, कॅम्प पुणे) या कनिष्ठ महाविद्यालयातील ४० विद्यार्थ्यांनी ‘जेईई’ परीक्षेत यश मिळविले आहे.

‘जेईई २०१८-१९’साठी महाविद्यालाच्या विज्ञान शाखेतील एकूण ६४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. त्या पैकी ४० विद्यार्थ्यांना या परीक्षेत यश प्राप्त झाले. या विद्यार्थ्यांची निवड ‘जेईई’च्या मुख्य परीक्षेसाठी (JEE MAINS 2018-19) झाली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, प्राचार्य परवीन शेख यांनी विद्यार्थांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search