Next
पुणे मेट्रो प्रकल्‍पासाठी ‘टाटा-सिमेन्‍स’ची संयुक्त कंपनी करारबद्ध
प्रेस रिलीज
Monday, October 08, 2018 | 04:54 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : टीआरआयएल अर्बन ट्रान्‍सपोर्ट प्रायव्‍हेट लिमिटेड (टाटा ग्रुप कंपनी) आणि सिमेन्‍स प्रोजेक्‍ट वेन्‍चर्स जीएमबीएच (सिमेन्‍स फायनान्शियल सविर्सेसची उपकंपनी) यांच्‍यामधील सहयोगाला पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हिंजेवाडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्‍प विकसित करण्‍यासाठी करारबद्ध केले आहे. महाराष्‍ट्राचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्‍ये आयोजित समारोहामध्‍ये या सहयोगाला पुरस्‍कार पत्र सुपूर्द केले. या वेळी टाटा सन्‍सचे अध्‍यक्ष एन. चंद्रशेखरन, सरकारी अधिकारी आणि सिमेन्‍स व टाटामधील इतर वरिष्‍ठ अधिकारी उपस्थित होते.

एलिव्‍हेटेड मेट्रो लाइनला हिंजेवाडी राजीव गांधी इंफोटेक पार्कपासून सुरूवात होईल आणि हा मार्ग बालेवाडीमधून शिवाजीनगरपर्यंत जाईल. हिंजेवाडी हे पुण्‍याचे जलदगतीने विकसित होत असलेले आयटी औद्योगिक केंद्र आहे आणि या केंद्राने चार लाखांहून अधिक लोकांना रोजगार दिला आहे. २३.३ किमीचा मार्ग आणि २३ स्‍टेशन्‍स असलेला हा २०१७च्‍या नवीन मेट्रो रेल्‍वे धोरणानंतर भारतातील पब्लिक-प्रायव्‍हेट-पार्टनरशिप (पीपीपी) मॉडेलवरील पहिला मेट्रो प्रकल्‍प आहे. जून २०१९मध्‍ये या प्रकल्‍पाच्‍या बांधकामाला सुरूवात होणार आहे आणि तीन वर्षांच्‍या कालावधीत हा प्रकल्‍प पूर्ण होईल. टाटा प्रोजेक्‍ट्स हे या सहयोगाला पाठिंबा देणारे ईपीसी भागीदार असतील.

टाटा सन्‍सच्‍या इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर, डिफेन्‍स व ऐरोस्‍पेस विभागाचे अध्‍यक्ष बानमाली अग्रवाल म्‍हणाले, ‘हा प्रकल्‍प दीर्घकालीन व मोठे इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर प्रकल्‍प सादर करण्‍याच्‍या आमच्‍या कौशल्‍य आणि क्षमतांना सादर करतो. आमच्‍या भागीदारांच्‍या सहयोगासह आम्‍हाला निर्धारित वेळेत प्रकल्‍पाच्‍या अपेक्षा व आवश्‍यकतांची पूर्तता करण्‍याचा विश्‍वास आहे. पुणे मेट्रो भविष्‍यात पुणेकर करणा-या प्रवासामधील बदलाला सादर करते. या प्रकल्‍पामुळे आर्थिक लाभांसोबतच या मार्गावर रोजगाराच्‍या देखील संधी निर्माण होईल.’

सिमेन्‍स लिमिटेडचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी सुनील माथुर म्‍हणाले, ‘सिमेन्‍स १५० वर्षांहून अधिक काळापासून इलेक्‍ट्रीफिकेशन व ऑटोमेशन क्षेत्रांमध्‍ये भारतासोबत सहयोगी राहिली आहे. कंपनी आपले स्थिर तंत्रज्ञान, सखोल सोल्‍यूशन कौशल्‍य, जागतिक प्रकल्‍पांचा अनुभव आणि प्रबळ स्‍थानिक उत्‍पादन उपस्थितीच्‍या माध्‍यमातून भारताच्‍या दीर्घकालीन विकासगाथेमध्‍ये योगदान देत आहे. आम्‍हाला या प्रकल्‍पाच्‍या अंमलबजावणीसाठी टाटा ग्रुपसोबत सहयोगी भागीदार असण्‍याचा आनंद होत आहे. या प्रकल्‍पाचा पुणेकरांच्‍या जीवनाच्‍या दर्जावर सकारात्‍मक परिणाम होईल.’

सिमेन्‍स फायनान्शियल सर्व्हिसेस (एसएफएस) भारतातील व्‍यापक क्षमतेसह जगभरातील इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर प्रकल्‍पांमध्‍ये गुंतवणूक करते. ‘पीपीपी’च्‍या माध्‍यमातून सिमेन्‍स शहरांना त्‍यांचे इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर सोल्‍यूशन्‍स पूर्ण करण्‍यामध्‍ये आणि स्‍मार्टर, अधिक स्थिर परिवहन नेटवर्क्‍स निर्माण करण्‍यामध्‍ये मदत करते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search