Next
श्रीपाद श्रीवल्लभ सारामृत
BOI
Thursday, September 20, 2018 | 10:12 AM
15 0 0
Share this article:

श्रीपाद श्रीवल्लभ हे भगवान दत्तात्रेयांचे प्रथम अवतार मानले जातात. त्यांचा जन्म सन १३२०मध्ये आंध्र प्रदेशमधील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पिठापूर क्षेत्री झाला, अशी माहिती देऊन सुभाष रामचंद्र (बाळ) आळवे उर्फ विठ्ठलदास बाळ यांनी ‘श्रीपाद श्रीवल्लभ सारामृत’मधून श्रीपाद श्रीवल्लभ यांचे चरित्र सारांश रूपाने कथन केले आहे.

‘श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत’ हे श्रीपादप्रभूंचे चरित्र विस्ताराने आहे. त्याचा सारांश लेखकाने केला आहे. एकूण ५३ अध्याय आहेत. श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या सूचनेनुसार त्यांचे समकालीन शंकरभट्ट हे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचे मूळ लेखक आहेत. पहिल्या अध्यायात त्यांना श्रीपादांच्या दर्शनाची लागलेली आस व त्यातून घडलेला प्रवास सुरू होतो. त्याचबरोबर श्रीपादप्रभूंचे चरित्र उलगडत जाते. हे कथारूपी चरित्र वाचताना श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या अवताराशी निगडीत सर्व वृत्तांत येथे आहे. प्रत्येक अध्याय पठणाचे फलही सांगितले आहे.   

प्रकाशक : श्रीपाद पब्लिकिशन्स
पाने : १२८
किंमत : १६० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Shankar Dandare About 326 Days ago
I wish to Purchase श्रीपाद श्रीवल्लभ सारामृत
0
0

Select Language
Share Link
 
Search