Next
‘महाबँके’ची खास गृह कर्ज शाखा कार्यरत
प्रेस रिलीज
Saturday, October 27, 2018 | 11:04 AM
15 0 0
Share this story

पुणे : बँक ऑफ महाराष्ट्रची गृह कर्ज मंजूरी आणि वितरणासाठी उघडलेली पहिली गृह कर्ज शाखा एफ. सी. रोड येथे २५ ऑक्टोबरपासून कार्यरत झाली आहे. बँकेचे कार्यकारी संचालक ए. सी. राऊत यांच्या हस्ते तीन ग्राहकांना कर्जाच्या मंजुरीपत्राचे वितरण करून या शाखेचे प्रातिनिधीक स्वरूपात उद्घाटन करण्यात आले.

बँकेची पूर्वीची हडपसर गाव शाखा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी स्थलांतरीत करून गृहकर्ज शाखा नावाने कार्यान्वित करण्यात आलेली आहे. केवळ गृह कर्ज मंजुरी या एकाच कारणासाठी उघडली असल्याने ग्राहकांच्या अर्जांवर वेगाने कार्यवाही करून बँकेला अंतिम निर्णय त्वरित देता देईल. गृहकर्ज संदर्भातील सर्व सेवा या शाखेच्या एका छताखाली उपलब्ध असून, कर्ज अर्जाच्या मंजुरीसह कर्ज अर्जासंदर्भातील कागदपत्रे घेणे, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे आणि कर्ज रकमेचे वितरणाचे कार्य ही शाखा करेल.

कार्यकारी संचालक राऊत म्हणाले, ‘ग्राहकांनी शाखेद्वारा दिल्या जाणार्‍या गृहकर्ज संदर्भातील सर्व सेवांचा लाभ घ्यावा आणि आपल्या नव्या घराचे स्वप्न साकार करावे.’  

या वेळी मुख्य सतर्कता अधिकारी एल. एन. रथ, सरव्यवस्थापक (ऋण प्राथमिकता) दत्ता डोके आणि पुणे शहर अंचल प्रमुख, तसेच सरव्यवस्थापक प्रशांत खटावकर यांच्यासह मुख्य कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.

गृह कर्ज शाखेचा पत्ता : ११८३/ए, यशोमंगल भवन, एफ. सी. रोड, शिवाजीनगर, पुणे ४११ ००५
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link