Next
आधुनिक तंत्रज्ञान रुग्णांसाठी ठरत आहे वरदान
झेन हॉस्पिटलमध्ये १८ वर्षीय तरुणीवर ब्रॉन्कोस्कोपीने यशस्वी उपचार
प्रेस रिलीज
Wednesday, December 05, 2018 | 12:13 PM
15 0 0
Share this story

मुंबई : चेंबूर येथील झेन मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये १८ वर्षीय तरुणीच्या फुफ्फुसात सहा दिवस अडकून पडलेली पिन ब्रोंकोस्कोपीने यशस्वीपणे बाहेर काढली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने असे गुंतागुंतीची प्रकार सहज हाताळता येत असल्याने हे तंत्रज्ञान रुग्णांसाठी वरदान ठरत आहे.

अलीकडेच उपचार करण्यात आलेली ही तरुणी २१ नोव्हेंबर रोजी गोव्यात होती. स्कार्फ परिधान करत असताना तोंडात धरलेली पिन तिने अनवधानाने गिळली. हे लक्षात येताच तिच्या नातेवाईकांनी तिला लगेचच गोव्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांकडे नेले. पिन नक्की कुठे अडकली आहे, ते शोधण्यासाठी तिच्या छातीचा एक्स-रे काढण्यात आला. तेथे एंडोस्कोपीने पिन काढण्याचा प्रयत्नही करण्यात आला,पण तो अयशस्वी ठरला. त्यामुळे तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तीथेही पिन काढण्यात यश मिळाले नाही. त्यानंतर गोव्यातीलच एका डॉक्टरने शस्त्रक्रिया करून पिन काढण्याचा सल्ला दिला; मात्र हा सल्ला न मानता तिच्या कुटुंबियांनी थेट चेंबूर येथील झेन हॉस्पिटल गाठले.

या विषयी अधिक माहिती देताना ‘झेन’मधील फुफ्फुसविकारतज्ज्ञ डॉ. अरविंद काटे म्हणाले, ‘रुग्ण येथे आली तेव्हा तिच्याकडे एक्स-रे अहवाल होता. फुफ्फुसात अडकलेली पिन अणकुचीदार होती आणि ती काढली नसती, तर हृदय व फुफ्फुसातील महत्त्वाच्या रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचले असते. त्याचप्रमाणे सहा दिवसांपासून ती पिन शरीरात असल्याने संसर्ग होण्याचा धोकाही होता. आतील अवयवांना इजा होईल म्हणून ओपन सर्जरी किंवा छेद देऊन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय अत्यंत गुंतागुंतीचा होता.’

‘फुफ्फुसाचा पापुद्रा फाटण्याची शक्यता असल्यामुळे ब्राँकोस्कोपी करून पिन बाहेर काढणे कठीण होते. या प्रकरणात फोरसेप्सचा वापर करून लवचिक ब्राँकोस्कोपने ती बाहेर काढली. यासाठी अत्यंत कुशल तज्ज्ञाची आवश्यकता असते. या प्रक्रियेनंतर काढलेला एक्स-रे अहवाल सामान्य होता,’ असे काटे यांनी सांगितले.
 
‘झेन’चे संचालक डॉ. रॉय पाटणकर म्हणाले, ‘आमची कुशल डॉक्टरांची टीम आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अशी गुंतागुंतीची प्रकरणे हाताळता येतात. कोणत्याही प्रकारचा विलंब टाळण्यासाठी आमची कोड ब्ल्यू टीम नेहमी सज्ज असते. अशा प्रकरणांमध्ये दुर्लक्ष केल्यास गुंतागुंत निर्माण होऊ शकते आणि म्हणूनच पुढील नुकसान टाळण्यासाठी लगेचच वैद्यकीय मदत घ्यावी.’

शस्त्रक्रिया न करताही माझ्या बहिणीची प्रकृती सामान्य झाली आहे. ही आव्हानात्मक केस यशस्वीपणे हाताळून माझ्या बहिणीचा जीव वाचविल्याबद्दल आम्ही झेन हॉस्पिटलच्या टीमचे आभारी असल्याची प्रतिक्रिया रुग्णाच्या नातेवाईकांनी व्यक्त केली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link