Next
ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
BOI
Thursday, August 10, 2017 | 06:21 PM
15 0 0
Share this article:

कोणती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लखडून जावे

‘कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कवितामध्ये आज निसर्गकवी ना. धों. महानोर यांची ‘ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे’ ही कविता...
............
ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
आणि ह्या मातीतुनी चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लखडून जावे

ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
आणि माझ्या पापणीला पूर यावे
पाहता ऋतुगंध कांती सांडलेली
पाखरांशी खेळ मी मांडून गावे

गुंतलेले प्राण ह्या रानात माझे
फाटकी ही झोपडी काळीज माझे
मी असा आनंदुनी बेहोष होता
शब्दगंधे, तू मला बाहूंत घ्यावे

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
धनश्री अजित जोशी About 33 Days ago
अप्रतिम
0
0

Select Language
Share Link
 
Search