Next
हिमायतनगरमध्ये बबन राऊत यांचा निरोप समारंभ
BOI
Wednesday, July 03, 2019 | 03:47 PM
15 0 0
Share this article:


हिमायतनगर : येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात सामाजिक जाणीव ठेवून कर्तव्य बजावणारे गोडाउन कीपर बबन राऊत यांची बदली भोकर येथे झाली. त्यानिमित्ताने दोन जुलैला येथील शासकीय धान्य गोदाम येथे त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तहसीलदार एस. बी. जाधव यांनी भूषविले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार अनिल तामसकर, विकास राठोड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शेख रफीक, मसूद भाई, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अनंता देवकते उपस्थित होते. 


या प्रसंगी बोलताना जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड म्हणाले, ‘हिमायतनगर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात गोदामपाल म्हणून पदभार स्वीकारला तेव्हापासून राऊट यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक गरजू व गरीब लाभधारकांना अंत्योदय योजनेसारख्या अनेक योजनांचा लाभ मिळवून दिला. शासकीय कर्तव्य बजावत असताना सामाजिक बांधिलकी जपत आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो हा उद्देश मनी बाळगून त्यांनी आपली सेवा चोखपणे बजावली.’ 

तहसील कार्यालयाचे कर्मचारी, तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार, प्रतिष्ठित नागरिक आणि पत्रकारांच्या वतीने राऊत यांना निरोप देण्यात आला. या वेळी हिमायतनगर तालुका मराठी पत्रकार संघाचे सर्व पत्रकार, सर्व पदाधिकारी, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sk.Habib Sk.Amir Rtd.Naib Tahsildar About 75 Days ago
Wish you very very Happy Life .and wish you Best of Luck.
0
0

Select Language
Share Link
 
Search