Next
शीळ येथील स्वराज्य प्रतिष्ठानने श्रमदानातून केली रस्त्याची दुरुस्ती
मिलिंद जाधव
Thursday, August 29, 2019 | 05:44 PM
15 0 0
Share this article:



भिवंडी :
ठाण्याच्या शहापूर तालुक्यातील शीळ ते किन्हवलीमधील चिंचपाडा येथे असलेल्या ओहळावरील पुलालगतचा रस्ता दोन महिन्यांपासून खचलेला होता. रस्त्यावर नेहमीची वाहतूक असते आणि गणेशोत्सवादरम्यान वर्दळ वाढून अपघात होऊ शकतो. म्हणून शीळ येथील स्वराज्य प्रतिष्ठानने श्रमदानातून रस्त्याची दुरुस्ती केली.

खचलेला रस्ता

गावातील तरुण मंडळींनी एकत्र येऊन प्रशासनाची वाट न बघता हा उपक्रम हाती घेतला आणि पूर्णत्वाला नेला. दगड, रेती, खडी, सिमेंट आदींचा वापर करून या तरुणांनी पुलालगतचा खचून गेलेला रस्ता व्यवस्थित केला. गावातील प्रत्येक तरुणाने समाजसेवा म्हणून या कामात सहकार्य केले.



बाळू वेखंडे, भालचंद्र बांगर, किशोर बांगर, धनेश म्हाडसे, विकी बांगर, रवींद्र वसंत बांगर, दिनेश म्हाडसे, गणेश लाड, अविनाश बांगर, राजेश बांगर, संदीप बांगर, हृषीकेश किरपन, मनोज किरपन, गणेश दत्तात्रय बांगर, करण बांगर, दिनेश विशे, हरेश बांगर, समीर बांगर, चेतन बांगर, प्रमोद बांगर, गणेश मधुकर बांगर आदी यात सहभागी झाले होते.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search