Next
बर्ट्रांड रसेल, लालजी पेंडसे
BOI
Friday, May 18 | 03:45 AM
15 0 0
Share this story

‘दी व्होल प्रॉब्लेम विथ दी वर्ल्ड इज दॅट फूल्स अँड फॅनॅटिक्स आर ऑल्वेज सो सर्टन ऑफ देमसेल्व्ह्ज, बट वाइझर पीपल सो फुल ऑफ डाउट्स’ असं मार्मिकपणे म्हणणारा बर्ट्रांड रसेल आणि लेखक लालजी पेंडसे यांचा १८ मे हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
......
१८ मे १८७२ रोजी मॉन्मथशरमध्ये जन्मलेला बर्ट्रांड रसेल हा तत्त्वज्ञ, गणितज्ञ, लेखक, इतिहासकार आणि सामाजिक भाष्यकार म्हणून प्रसिद्ध होता. त्याचा तर्कशास्त्राचा उत्तम अभ्यास होता. तो उमराव घराण्यातला होता आणि वंशपरंपरेने ‘अर्ल’ बनला होता. जगात शांतता नांदावी, युद्ध होऊ नये यासाठी त्याने आपल्या लेखनातून आणि भाषणांतून आग्रहाने बाजू मांडली.

कठीण संकल्पना सामान्य माणसांना कळतील अशा सोप्या भाषेत सांगणं त्याला चांगलंच जमत होतं. आइन्स्टाइनची रिलेटिव्हिटीची थिअरी त्याने जशी मांडली, तशी फार कमी लोकांना जमली असं म्हटलं जातं. त्याला गणित फारच आवडत होतं - इतकं की युक्लिडीयन भूमितीची तुलना त्याने ‘पहिल्या प्रेमाशी’ केली होती. त्याचं ‘थिअरी ऑफ नॉलेज’विषयीचं लेखन गाजलं होतं. त्याने ७०हून जास्त पुस्तकं लिहिली आहेत.

जर्मन सोशल डेमॉक्रसी, अन एसे ऑन दी फाउंडेशन्स ऑफ जॉमेट्री, प्रिन्सिपल्स ऑफ मॅथेमॅटिक्स, दी प्रॉब्लेम ऑफ फिलॉसॉफी, व्हाय आय अॅम नॉट ए ख्रिश्चन, ए हिस्टरी ऑफ वेस्टर्न फिलॉसॉफी, दी काँक्वेस्ट ऑफ हॅपिनेस, ऑन डिनोटिंग, मॅरेज अँड मोराल्स, एबीसी ऑफ रिलेटिव्हिटी, पॉलिटिकल आयडियल्स, ह्युमन नॉलेज, दी प्रॉब्लेम ऑफ चायना, अशी त्याची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. त्याला १९५० सालचं साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळालं होतं. दोन फेब्रुवारी १९७० रोजी त्याचा कार्नाव्हर्नशरमध्ये मृत्यू झाला. 
.....
लालजी मोरेश्वर पेंडसे
१८ मे १८९८ रोजी जन्मलेले हे लालजी मोरेश्वर पेंडसे हे लेखक म्हणून ओळखले जातात. नवमतवाद, साहित्य आणि समाजजीवन, धर्म की क्रांती, सप्तदशी, महाराष्ट्राचे महामंथन, राष्ट्रद्रष्टे स्वामी विवेकानंद, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. १३ सप्टेंबर १९७३ रोजी त्यांचा मृत्यू झाला.


(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link