Next
पहिल्या मराठवाडा भवन निर्माण संकल्प मेळाव्यातून २१ लाखांची मदत
BOI
Saturday, April 08, 2017 | 07:13 PM
15 0 0
Share this article:

पुणे : पहिला मराठवाडा भवन निर्माण संकल्प मेळावा गुरुवारी सायंकाळी (सहा एप्रिल) पुण्यातील मराठवाडा जनविकास संघ कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. मराठवाड्यातील सर्व बांधवांनी आपल्या घरी ‘मराठवाडा सहायता निधी संकलन पेटी’ ठेवून दररोज त्यात १० रुपये टाकणार असे त्या वेळी युवकांनी ठरवले.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने आणि संत-महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पिंपरी-चिंचवड महानगरात भव्य दिव्य मराठवाडा भवन निर्माण करण्याचे स्वप्न मराठवाड्यातील माणसांनी उराशी बाळगले आहे. त्या अनुषंगाने सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, उद्योग, व्यापार अशा विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. त्या वेळी मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते अरुण पवार यांनी ११ लाख ११ हजार एकशे अकरा रुपयांचा चेक मराठवाडा भवनासाठी दिला. तसेच, नरसिंह साखर कारखान्याचे इंदापूर येथील अध्यक्ष शंकरतात्या बोरकर यांनी पाच लाख ५१ हजार, सामाजिक कार्यकर्ते गोरक्षनाथ अमरुळे यांनी दोन लाख ५१ हजार, उद्योजक माधव मनोरे यांनी एक लाख अकरा हजार, उद्योजक दीपक जाधव यांनी एक लाख अकरा हजार, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी घोडके यांनी अकरा हजार, मारुती बानेवार यांनी अकरा हजार रुपयांचा निधी दिला. अशा प्रकारे मराठवाडा भवन उभारणीसाठी संकलन निधी जमा करण्यात आला. 
‘आपण सर्व जण एकत्र आलो तर पुढील गुढीपाडव्यापर्यंत मराठवाडा भवन ही संकल्पना साकार झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच सर्वांनी मराठवाडा भवनासाठी कुठलाही स्वार्थ न ठेवता सहकार्य करावे,’ असे आवाहन संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी मराठवाड्यातील बांधवांना केले.

या वेळी नितीन चिलवंत, भैरुजी मंडले, प्रकाशजी इंगोले, सूर्यकांत कुरुलकर, एम. डी. घोटके, अण्णा जोगदंड, शशिकांत दुधारे, गुरू कारकर, वामन भरगांडे, मारुती बानेवार, संजय कीर्तने, अभिजित भालशंकर, अभिमन्यू गाडेकर, धनाजी येवले, प्रवीण लहाने, जे. डी. माने, टी. एच. काळे, महादेव बनसोडे, कृष्णा खडसे, एस. डी. जोशी, बी. आर. गाडेकर, अनिल फरकांदे, केशव साळवे, सिद्धार्थ जाधव, शरद देसले, दत्तात्रय धोंडगे, हेमाकांत महामुनी, अमोलजी लोंढे, दिनेश वाकचौरे, पांडुरंग धोमडे, नितीन उघडे-पाटील, राजेंद्र मोरे, मारुती आवरगंड, वंशराम मासोळे, अविनाश थिटे, बापू सुतार, संतोष सोनावले, एस. व्ही. सामसे, शिवलिंग वाडकर, एस. व्ही. डोलारे, अनिलजी कचरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search