Next
‘स्मृतीवन’ कार्यक्रमा अंतर्गत नागरिकांनी केले वृक्षारोपण
परांजपे स्कीम्सच्या प्रकल्पांमध्ये एक हजार वृक्षांचे रोपण
BOI
Tuesday, July 16, 2019 | 04:53 PM
15 0 0
Share this article:


पुणे : परांजपे स्कीम्स (कन्स्ट्रक्शन) लिमिटेडच्या वतीने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अर्थात सीएसआर अंतर्गत नुकतेच हिंजवडी येथील ‘ब्लू रिज’ मध्ये आणि भूगाव येथील ‘फॉरेस्ट ट्रेल्स’ येथे तब्बल एक हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले.

गेल्या दोन वर्षांपासून, परांजपे स्कीम्सच्या वतीने ‘स्मृतीवन’ हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये  नागरिक आपल्या आप्तेष्टांच्या नावाने वृक्षारोपण करतात. या वेळी माजी क्रिकेटपटू पद्मभूषण चंदू बोर्डे आणि ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. माजी क्रिकेटपटू (स्पिन बॉलर) सदानंद मोहोळ, परांजपे स्कीम्स (कन्स्ट्रक्शन)लिमिटेडचे संचालक शशांक परांजपे, बिझनेस डेव्हलपमेंट प्रमुख अमित परांजपे आणि फॉरेस्ट ट्रेल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदेश खटावकर आदी  या वेळी उपस्थित होते.

‘स्मृतीवन’ कार्यक्रमादरम्यान प्रत्येक नागरिकाने आपल्या जवळच्या व्यक्तीच्या नावे एक झाड लावले. या झाडांमध्ये मुख्यत: अंगारा, काटेसावर, चिंच, ताम्हण, बकुळ, जांभूळ यांसारख्या स्थानिक प्रजातींच्या झाडांचा समावेश आहे. 

या वेळी बोलताना ‘परांजपे स्कीम्स’चे संचालक शशांक परांजपे म्हणाले, ‘नागरिकांच्या सक्रीय सहभागावर परांजपे स्कीम्सचा विश्वास असून, ‘स्मृतिवन’ या उपक्रमाला मिळालेल्या प्रतिसादाने आम्ही भारावून गेलो आहोत. हा उपक्रम दर वर्षी करण्याचा आमचा मानस आहे.’ 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search