Next
तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
प्रेस रिलीज
Friday, July 07, 2017 | 06:40 PM
15 0 0
Share this article:

वर्धा : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा व श्री संताजी सेवा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा शनिवारी १५ जुलै रोजी कृष्णनगर येथील श्री संताजी सांस्कृतिक सभागृहात होणार आहे. खासदार रामदास तडस यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत. ओबीसी महामंडळाचे संचालक भूषण कर्डिले, माजी खासदार सुरेश वाघमारे यांची या वेळी  प्रमुख उपस्थिती असेल.

यंदाच्या दहावी, बारावीच्या परीक्षेमध्ये  तेली समाजातील सर्व शाखीय समाजामधील अनेक विद्यार्थांनी चांगले यश मिळविले असून, समाजाचे नाव मोठे केले आहे. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना बारावीमध्ये ८० टक्के व दहावीमध्ये ८५ टक्के गुण प्राप्त झाले आहेत, त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यात बारावी विज्ञान शाखेतून वर्धा जिल्ह्यात प्रथम आलेली मनाली डायगव्हाण व सीबीएसई बोर्डाच्या दहावी परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आलेला वेदान्त मंगरूळकर आणि मुलींमधून पहिली आलेली एसएससी बोर्डाची श्रेया आकारे यांचा समावेश आहे.

वर्धा जिल्ह्यातील तेली समाजातील महाराष्ट्र बोर्ड, सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी आपले अर्ज आणि गुणपत्रिकेची  झेरॉक्स मंडळाच्या कृष्णानगर येथील मुख्य कार्यालयात, तसेच सी टेंडलिक्स, आयटीआय रोड, आनंद कम्प्युटर, साई मंदिराजवळ, राहिल ड्रायव्हिंग स्कूल, सेवाग्राम, नामदेव महाराज वेल्डिंग वर्क्स, गोपुरी चौक, साईबाबा स्टील साटोने लेआउट, ई-सुविधा केंद्र, सेलू, पंकजभाऊ तडस जनसंपर्क कार्यालय, देवळी, आशिष वडांमाद्रे एलआयसी ऑफिसमागे, आर्वी, मनीषा लँड डेव्हलपर्स, बॅचलर रोड, वर्धा, सायंकार कॉम्पलेक्स बोरगांव मेघे, साई अमन हॉटेल, कारंजा, राजूभाऊ इखार, हिंगणघाट येथे द्यावेत असे आवाहन आयोजकांच्या वतीने महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष अतुल वंदिले, श्री संताजी सेवा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष प्रशांत बुर्ले, श्री संताजी सेवा व सांस्कृतिक मंडळाचे सचिव सुनील शिंदे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :
९४२०० ६१६१४, ९४२२९ ०४११०, ९९६४० ९७१७८, ९७६४० ९७१७८
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search