Next
‘सीए इन्स्टिट्यूट’तर्फे रत्नागिरीत शहा, देशपांडे यांची कार्यशाळा
BOI
Monday, June 24, 2019 | 12:25 PM
15 0 0
Share this article:


रत्नागिरी : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे ‘शेअर व्यवहारांचे करनिर्धारण व पब्लिक ट्रस्ट संदर्भातील आयकरातील तरतुदी’ यावर एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. 

या कार्यशाळेत सीए सुबोध शहा यांनी ‘शेअर व्यवहारांचे करनिर्धारण व बांधकाम क्षेत्रासंदर्भात जीएसटी तरतुदी’ या विषयावर विवेचन करून ‘शेअर व्यवहारातील भांडवली नफा काढताना घ्यावयाची काळजी’ यावर विस्तृत माहिती दिली. सीए सी. व्ही. देशपांडे यांनी ‘पब्लिक ट्रस्ट संदर्भातील आयकर तरतुदी’ विस्तृतपणे सादर केल्या; तसेच पब्लिक ट्रस्ट व करनिर्धारण करताना करमाफ उत्पन्न व त्याबाबतीतील अनेक तरतुदींचा उहापोह केला. 


या वेळी व्यासपीठावर रत्नागिरी सीए इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष अँथनी राजशेखर, उपाध्यक्ष बिपीन शहा, सेक्रेटरी आनंद पंडित उपस्थित होते. रत्नागिरीतील अनेक सीए कर सल्लागार व विद्यार्थ्यांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search