Next
चुकीचे व्यायाम टाळा..
BOI
Wednesday, March 21, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this story


व्यायाम हे शरीर क्षमता वाढवणारे व हृदयाची कार्यक्षमता वाढवणारे असतात. यात पीळदार शरीरयष्टी किंवा आजच्या मुलांचा परवलीचा शब्द ‘सिक्स पॅक’ असे काही होत नाही. शरीरावरील चरबी कमी होण्यास व्यायामशाळेतील मशीन्स, डम्बेल्ससारखा वजन उचलण्याचा व्यायाम गरजेचा आहे.... यासाठीच ‘पोषणमंत्र’मध्ये आज पाहू या चुकीच्या व्यायामपद्धतीबद्दल...
..................
मागील लेखात आपण व्यायामशाळेत हमखास होणाऱ्या चुकांबद्दल बघितले. या चुकांकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे काय परिणाम होतात, ते आपण या भागात पाहू या. झुंबा व स्पिनिंगची बॅच करण्याचा उत्साह तरुणांपासून साठीपर्यंतच्या अनेक लोकांना असतो. 

झुंबा म्हणजे लयबद्ध संगीताच्या तालावर व्यायाम, ज्यात मुख्यत्वे नृत्याचा समावेश असतो. यामधील नृत्याच्या हालचाली या शरीराला व्यायाम होईल अशा असल्यामुळे तशा हालचाली झाल्यास, तुमचा व्यायाम होतो. उदा. झुंबामध्ये लंजेस व स्क्वाट्स या नृत्यातून त्या तशा होणे अपेक्षित असते, पण ९९ टक्के लोकांचे याकडे अजिबात लक्ष नसते.  नृत्याची गती जास्त असल्याने पुढील स्टेप्स करण्याचा प्रयत्नात पहिली स्टेप पूर्ण होत नाही, त्यामुळे मांड्या व हिप्ससाठी असलेले ओतच लंजेस व स्क्वाट्स  होतच नाहीत; पण जलद हालचालीमुळे भरपूर घाम येऊन वजन काट्यावर वजन एक किलोने कमी झलेले दिसते. त्यामुळे लोक खूप खूश असतात. आठवडा-पंधरा दिवसांनी वजन केल्यावर परत वजन ‘जैसे थे’. नाही म्हणायला महिनाभरात थोडे कमी होते एवढीच जमेची बाजू.

झुंबा, एरोबिक्स, ट्रेडमील, सायकल, स्टेपर इ. व्यायाम हे शरीर क्षमता वाढवणारे व हृदयाची कार्यक्षमता वाढवणारे व्यायाम आहेत. यात पिळदार शरीरयष्टी किंवा आजच्या मुलांचा परवलीचा शब्द ‘सिक्स पॅक’ असे काही होत नाही. शरीरावरील चरबी कमी होण्यास व्यायामशाळेतील मशीन्स, डम्बेल्ससारखा वजन उचलण्याचा व्यायाम गरजेचा आहे. सध्या व्यायामशाळेत स्त्रियांचा सगळा कल झुंबा, पॉवर योगा व स्पिनिंग याकडेच असतो. हे व्यायाम मनाला आनंद देणारे असतातच, शिवाय सर्व वयोगटांतील स्त्रियांना नृत्याची आवड असल्याने या व्यायाम प्रकारांचा त्या खूप आनंद घेतात. असे असले तरीही चरबी जाण्यासाठी भाग मशीन्स व डंबेल्स यांसारख्या वजन उचलण्याच्या व्यायामाला पर्याय नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे.

जिममध्ये वजन उचलतानासुद्धा अनेक गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. किती सेप्स, किती वजन उचलून भरायचं व प्रत्येक रेपीटेशनमध्ये श्वास घेणे व सोडणे, तसेच हे व्यायाम करताना किती वेग असावा, यालाही खूप महत्त्व आहे. सर्वसाधारणपणे आजकालचा तरुण वर्ग तरुण वर्ग खूपच भराभर गतीने वजन उचलतो. यामुळे ‘मसल ब्रेक’ होण्याऐवजी ‘मसल इन्ज्युअर्ड’ होतो. 

व्यायाम शाळेतील तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली व्यायाम न करता मित्रामित्रांचे ग्रुप करून व्हिडिओ पाहून व्यायाम करणारी मंडळीही खूप बघायला मिळतात. त्यात आपण किती धोका पत्करतो, याची या तरुणाईला जरासुद्धा जाणीव नसते. त्यामुळेच आपण अधुनमधून पेपरमध्ये व टीव्हीवर ‘व्यायामशाळेत व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका येऊन तरुणाचा मृत्यू’ अशा बातम्या वाचतो. म्हणूनच लोकांनी व्यायामशाळेत योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.

- आश्लेषा भागवत
मोबाइल : ९४२३० ०८८६८ 
ई-मेल : ashlesha0605@gmail.com

(लेखिका पुण्यातील आहारतज्ज्ञ आहेत.) 

(‘पोषणमंत्र’ या लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/4tP7a7 या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Anjali gadgil About 355 Days ago
सगळे धोके समजावुन सांगितले. हे धोके तरुणांनी लक्षात ठेवावे
0
0

Select Language
Share Link