Next
‘होंडा’च्या टू-व्हीलरच्या विक्रीमध्ये वाढ
प्रेस रिलीज
Thursday, April 05, 2018 | 12:40 PM
15 0 0
Share this story

गुरूग्राम : होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.ने (एचएमएसआय) आर्थिक वर्ष २०१७-१८मध्ये ऐतिहासिक उच्चांक साध्य केला व नवा विश्वविक्रम निर्माण केला आहे.

या कामगिरीबाबत बोलताना ‘होंडा’चे सेल्स व मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ‘२०१७-१८ या वर्षामध्ये भारतात ‘होंडा’ची लक्षणीय प्रगती झाली आणि होंडा टू-व्हीलर्स इंडिया ही केवळ एका वर्षामध्ये ग्राहकांमध्ये एक दशलक्षाहून अधिक इतक्या संख्येने व वेगाने वाढ करणारी जगातील एकमेव टू-व्हीलर आहे. ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने ‘होंडा’ने अतिशय आव्हानात्मक लक्ष्य साध्य केले आणि विक्रीमध्ये २२ टक्के वाढ नोंदवत सहा लाख १२३ हजार ८८९ युनिट इतकी सर्वाधिक विक्री केली. चार नवे ब्रँड, क्षमतेमध्ये नव्याने वाढ, दूरवरच्या भागांपर्यंत पोहोचत ५०० नव्या नेटवर्क आउटलेटचा समावेश करत ‘होंडा’ने मोटरसायकलसाठी नवे ग्राहक जोडले; तसेच स्कूटर क्षेत्रातील आघाडीचे स्थान कायम ठेवले.’

 
आर्थिक वर्ष २०१७-१८मधील विक्री :
होंडा टू-व्हीलर्स इंडियाच्या एकूण विक्रीमध्ये २२ टक्के म्हणजे, आर्थिक वर्ष २०१६-१७ मधील पाच लाख आठ हजार २३० युनिटवरून आर्थिक वर्ष २०१७-१८मध्ये सहा लाख १२३ हजार ८८६ युनिटपर्यंत वाढ झाली.

‘होंडा’ची देशांतर्गत विक्री आर्थिक वर्ष २०१६-१७मध्ये चार ७२५ हजार ६७ युनिट झाली, तर आर्थिक वर्ष २०१७-१८मध्ये पाच लाख ७७५ हजार २४३ युनिट विक्री झाली. जागतिक स्तरावर नवे विक्रम निर्माण करत, निर्यातीने प्रथमच तीन लाखाची मर्यादा ओलांडली व त्यात आर्थिक वर्ष २०१६-१७मधील २८३,१६३ युनिटवरून आर्थिक वर्ष २०१७-१८मध्ये ३४८, ६४३ युनिटपर्यंत, म्हणजे २२ टक्क्यांनी वाढ झाली. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link