Next
‘स्वच्छ’ माळेगावचा गौरव
प्रेस रिलीज
Monday, June 05, 2017 | 11:15 AM
15 0 0
Share this article:

मुंबई : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात नाशिक जिल्हा पातळीवर माळेगाव (ता. सिन्नर) ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला. मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये नुकत्याच झालेल्या सोहळ्यात माळेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल आव्हाड, समिती अध्यक्ष माजी सरपंच तुकाराम सांगळे, ग्रामविकास अधिकारी व नाशिक जिल्हा ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष कैलासनाना वाघचौरे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरवण्यात आले.

महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री बबनराव लोणीकर, नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, प्रधान सचिव राजेशकुमार यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. त्यानंतरच्या सत्रात केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे व तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

माळेगावच्या यशाबद्दल सिन्नर तालुका ग्रामसेवक युनियनच्या वतीने टीम माळेगाव व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, सहायक गटविकास अधिकारी पी. एम. बिब्बे, विस्तार अधिकारी बबनराव बिन्नर, संजीवनी चौधरी यांचे अभिनंदन करण्यात आले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search