Next
शेअर बाजारातील तेजीचा अन्वयार्थ
BOI
Tuesday, July 31 | 06:45 AM
15 0 0
Share this story

शेअर बाजारात सध्या तेजी असून, ‘सेन्सेक्स’ने ३७ हजारांचा, तर ‘निफ्टी’ने ११ हजारांचा विक्रमी टप्पा पार केला आहे. गेल्या १३ वर्षांत सेन्सेक्सने सात हजार ते ३७ हजार ही वाटचाल केलेली आहे. या तेजीचा अन्वयार्थ काय आहे, याबद्दल सांगत आहेत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. वसंत पटवर्धन.
...........
शेअर बाजारात सध्या दिन-प्रतिदिन तेजी चालू आहे. लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप या सर्व प्रकारच्या शेअर्सच्या दरात सतत वाढ होत आहे आणि ही वाढ यापुढेही निदान दिवाळीपर्यंत चालू राहावी.  

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने (सेन्सेक्स) ३७ हजारांची सीमा ओलांडून ३७ हजार ३३६पर्यंत घोडदौड केली आहे. दिवाळीपर्यंत तो ३९ ते ४० हजारांपर्यंत पोहोचू शकेल. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा निर्देशांकही सध्या १२ हजार २७८पर्यंत वाढला आहे. दिवाळीपर्यंत तो १२ हजार ५०० ते १३ हजारपर्यंत गेल्यास आश्चर्य वाटू नये. गेल्या बारा महिन्यांतील या दोघांचे किमान उच्चांक अनुक्रमे ३९ हजार ८१ ते ९,६८६ असे होते. गेल्या तेरा वर्षांतील ही अभूतपूर्व वाढ आहे. त्याची कारणे जागतिक आर्थिक, राजकीय परिस्थिती व भारतातील राजकीय आणि आर्थिक स्थितीत दडली आहेत. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१८च्या सुरुवातीला चीन आणि उत्तर कोरियाबरोबर पंगा घेतला होता. चीनशी व्यापारयुद्ध चालू असले, तरी ते अधूनमधून थंडावते. तसे आता दिसत आहे. चीनच्या वस्तूंवर त्यांनी २५ टक्के आयात दर लावला आहे. साहजिकच अमेरिका आता अन्य देशांतील वस्तूंच्या आयातीला प्राधान्य देत आहे. त्याचा फायदा भारताला मिळत आहे. अमेरिकेने, इराणने पेट्रोलचे उत्पादन व विक्री कमी करावी असे म्हटले आहे व इराणवर दबाव आणला आहे. तरीही भारत इराणकडून तेल घेतच राहणार. कारण इराण पेट्रोलचे पैसे रुपयांत घेतो. शेअर बाजार वर जाण्याचे आणखी एक कारण म्हणजे मोदी सरकारने अविश्वास ठराव फेटाळून लावण्यात यश मिळवले आहे. विरोधकांना फक्त १२५ मते मिळाली, तर सत्ताधीश भाजपच्या पारड्यात ३२५ मते पडली. आता हे सरकार २०१९ची लोकसभेची निवडणूकही जिंकेल याचे हे स्पष्ट संकेत आहेत. बाजाराला राजकीय स्थैर्य नेहमी आवडते. 

गेल्या आठवड्यात सरकारने अनेक वस्तूंवरील वस्तू व सेवाकर (जीएसटी) कमी केला. त्यामुळे वस्तू थोड्या स्वस्त होतील. एअर कंडिशनर, सिमेंट, मोठे टीव्ही सेट यापुढे थोडे स्वस्त होतील.याशिवाय शेतकऱ्यांना १४ खरीप पिकांचा हमी भाव ५० रुपयांनी वाढवून दिल्याने बळीराजा खूश आहे. पावसाळा समाधानकारकरीत्या देशभर सर्वत्र चालू आहे. त्यामुळे खरीप पिकांचे उत्पादन वाढेल. रब्बीसाठीही जास्त क्षेत्रावर पेरणी व्हावी. पंधरा दिवसांनी स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण करतील. तेही आश्वासक असेल व शेअरबाजार तेजी दाखवून त्याची नोंद घेईल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link