Next
‘अॅलिएक्सिस’तर्फे ‘आशिर्वाद’चा उर्वरित भाग संपादित
प्रेस रिलीज
Saturday, July 07, 2018 | 02:32 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘अॅलिएक्सिस एसए’ या अत्याधुनिक प्लास्टिक पाइपिंग यंत्रणांच्या उत्पादन आणि वितरणातील जागतिक स्तरावर अग्रेसर असणाऱ्या कंपनीने आशिर्वाद पाइप्स प्रा. लि.चे उर्वरीत भाग कंपनीच्या संस्थापक पोद्दार कुटुंबाकडून संपादित केले आहेत.

या व्यवहारामुळे ‘अॅलिएक्सिस’ आणि पोद्दार कुटुंबातील २०१३ साली स्थापन झालेल्या संयुक्त व्हेंचरची यशस्वीपणे पूर्तता झाली आहे. दोन्ही भागीदारांनी निर्माण केलेल्या बळकट पायावर उभारणी करण्याकडे ‘अॅलिएक्सिस’ लक्ष देणार आहे आणि याद्वारे भारतात प्लंबिंग आणि शेतकी बाजारपेठांमध्ये विकासाच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. ‘अॅलिएक्सिस’साठी भारत ही सर्वात प्रमुख बाजारपेठ आहे आणि या व्यवहारामुळे देशाप्रती असलेल्या दीर्घकाळ वचनाची पूर्तता केली जाणार आहे.

या व्यवहाराचा भाग म्हणून, ‘अॅलिएक्सिस’ने ‘आशिर्वाद’मधील पूर्वीच्या ६० टक्के भागांमध्ये अतिरिक्त ३७ टक्के भाग प्राप्त केले आणि उर्वरीत तीन टक्के भाग तीन वर्षांच्या कालावधीनंतर पोद्दार कुटुंबाकडून घेतले. या व्यवहाराचे आर्थिक व्यवहार जाहीर न करण्याचा निर्णय दोन्ही पक्षकारांनी घेतला आहे.

‘अॅलिएक्सिस’चे सीईओ लॉरेंट लिनोईर म्हणाले, ‘भारतातील या नव्या टप्प्याबाबत आम्ही अतिशय उत्सुक आहोत. आता ‘आशिर्वाद’चे कर्मचारी आणि आमचे वितरक भागीदार म्हणून आम्ही दोन हजार २०० लोक एकत्रित काम करणार आहोत. या संपादनामुळे ‘अॅलिएक्सिस’च्या भारतातील विकासात एक महत्त्वाचा टप्पा पार झाला आहे. भारतीय बाजारपेठांमध्ये ‘आशिर्वाद’च्या विकासाला आता आम्ही पूर्णपणे पाठिंबा देऊ शकणार आहोत आणि उपखंडांमध्येही आमच्या अॅक्टिव्हिटीजचा विस्तार करणार आहोत. संपूर्ण बांधकाम आणि शेतकी समुदायाला याचा लाभ मिळवून देण्यासाठी, आमच्या जागतिक स्तरावरील नाविन्यपूर्णता आणि उत्पादनातील तज्ज्ञता यांचा लाभ घेतला जाईल.’

‘मी ‘आशिर्वाद’चे संस्थापक आणि आमचे अनेक वर्षांपासूनचे निष्ठावान व्यावसायिक भागीदार असलेल्या पोद्दार कुटुंबाला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा देऊ इच्छितो. ‘अॅलिएक्सिस’च्या पाठिंब्यासह आणि पवन, दीपक आणि विकास पोद्दार यांच्या नेतृत्वाखाली ‘आशिर्वाद’ देशातील एक आघाडीची कंपनी म्हणून विकसित झाली. ‘आशिर्वाद’च्या संचालक मंडळात कायम राहून पवन यांनी यापुढची आमची अधिकृत संलग्नितता स्वीकारली, ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.’

‘आशिर्वाद’चे व्यवस्थापकीय संचालक आणि सह-संस्थापक पवन पोद्दार म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांतील ‘अॅलिएक्सिस’बरोबरच्या आमच्या संयुक्त व्हेंचरबरोबर आम्ही आमचा व्यवसाय लक्षणीयरित्या वाढवला. गेल्या पाच वर्षांपासूनच्या भागीदारीसाठी आम्ही ‘अॅलिएक्सिस’चे आभार मानतो आणि ‘आशिर्वाद’ चांगल्या हातात गेली आहे, यापुढेही ‘आशिर्वाद’च देशातील प्लंबिंग सोल्युशन पुरवठादार म्हणून अग्रणी राहील. ‘आशिर्वाद’च्या व्यवस्थापनात दीपक मल्होत्रा यांना पाठिंबा देताना मला अतिशय आनंद झाला आहे. दीपक अतिशय उत्तम व्यावसायिक आहेत, कंपनी अधिक उंचीवर जावी, यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो.’

‘आशिर्वाद’ने दीपक मल्होत्रा आणि सुनील बनठिया यांची व्यवस्थापकीय संचालक आणि प्रमुख प्रक्रिया अधिकारी या पदावर अनुक्रमे नेमणूक केली आहे. पाच जुलै २०१८ पासून त्यांनी कार्यभार सांभाळायला सुरुवात केली. दीपक आणि सुनील यांच्या सखोल ज्ञानाचा वितरण व्यवस्थापन, ब्रँडिंग आणि प्रक्रिया व्यवस्थापन यासाठी लाभ होईल, असा विश्वास कंपनी व्यवस्थापनातर्फे व्यक्त करण्यात आला आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link