Next
अरुण साधू
BOI
Sunday, June 17 | 03:45 AM
15 0 0
Share this story

सिद्धहस्त कादंबरीकार, कथाकार, नाटककार, बिनीचे पत्रकार आणि समीक्षक अशा विविधांगी पैलूंनी आपलं स्थान निर्माण करणाऱ्या अरुण साधू यांचा १७ जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
.....  
१७ जून १९४१ रोजी जन्मलेले अरुण मार्तंड साधू हे साम्यवादी क्रांतीच्या इतिहासाशी मराठी वाचकांचा प्रथमच अतिशय ओघवत्या भाषेत परिचय करून देणारे सिद्धहस्त कादंबरीकार, कथाकार, नाटककार, बिनीचे पत्रकार आणि समीक्षक म्हणून ओळखले जातात. 

आपल्या जवळपास ३० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी केसरी, माणूस, इंडियन एक्स्प्रेस, टाइम्स ऑफ इंडिया, फ्री प्रेस जर्नल अशा विविध वृत्तपत्रांतून आणि साप्ताहिकांमधून काम केलं. मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. लोकविज्ञान चळवळ, स्त्रीमुक्ती संघटना, ग्रंथाली, थिएटर अकादमी अशा संस्थांमधेही त्यांचं योगदान होतं. 

मुंबई दिनांक, सिंहासन, आणि ड्रॅगन जागा झाला, बहिष्कृत, त्रिशंकू, स्फोट, विप्लवा, शापित, शुभमंगल, मुखवटा, झिपऱ्या, तडजोड, शोधयात्रा, बेचका, एक माणूस उडतो त्याची गोष्ट, बिनपावसाचा दिवस, मुक्ति, ग्लानिर्भवति भारत, प्रारंभ, बसस्टॉप व इतर ३ एकांकिका, अक्षांश-रेखांश, तिसरी क्रांती, सभापर्व, अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

त्यांना न. चिं. केळकर पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार, फाय फाउंडेशन पुरस्कार, जनस्थान पुरस्कार असे मानाचे पुरस्कार मिळाले होते. २००७ साली नागपूरमध्ये भरलेल्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 

२५ सप्टेंबर २०१७ रोजी त्यांचं निधन झालं.

(अरुण साधू यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. साधू यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
..............


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link