Next
ठाण्यात पत्रकारांनी केला दहशतवादी हल्ल्याचा निषेध
प्रेस रिलीज
Monday, February 18, 2019 | 04:37 PM
15 0 0
Share this article:

ठाणे : पुलवामा येथे भारतीय जवानांवर पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यांचा ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांनी निषेध केला आहे.

ठाणे जिल्हा पत्रकार संघाची बैठक नुकतीच ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात पार पडली. या बैठकीत पाकिस्तानी भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच ठाणे जिल्ह्यातील दिवंगत पत्रकार बाळ जगे, आशिष पाठक, मंदार पुरकर, अजित म्हात्रे, भरत खरे, पां. ना. सकपाळ, भाऊ सुळे, कुंदन गोटे, श्रीराम भिडे व अन्य पत्रकारांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

या वेळी जिल्हाध्यक्ष संजय पितळे, उपाध्यक्ष तुषार राजे, सरचिटणीस नारायण चिटणीस, श्रीकांत खाडे, सिद्धार्थ कांबळे, संजय साळुंखे यांसह अन्य कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search