Next
ब्रिटिश कौन्सिलच्या पुणे लायब्ररीचा पहिला वर्धापन दिन उत्साहात
प्रेस रिलीज
Monday, September 03 | 05:08 PM
15 0 0
Share this storyपुणे : ब्रिटिश कौन्सिलच्या पुण्यातील अत्यंत उत्साही सांस्कृतिक केंद्राने विविध कार्यक्रमांद्वारे आपला पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमात सुपरहिरोजच्या संकल्पनेवर आधारित विविध वयोगटातील तरूण मुलांसाठी आकर्षक कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. सुपरहिरो कळसूत्री बाहुल्यांसोबत कथाकथनापासून ते बॅले शिकण्यापर्यंत आणि रोबोटिक कार्यशाळेत ऑटेमेटेड रोबोंचा आनंद घेण्यापर्यंत या सप्ताहाच्या शेवटी मुलांमधील हुशारी आणि कलात्मकता यांचा उत्सव साजरा केला गेला. या कार्यक्रमात शहरातील सुमारे १०० मुले सहभागी झाली होती.

आपल्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त बोलताना ब्रिटिश कौन्सिलच्या एरिया डायरेक्टर- वेस्ट इंडियाच्या हेलेन सिल्व्हेस्टर म्हणाल्या, ‘ब्रिटिश कौन्सिलने मागील ७० वर्षांमध्ये आम्ही काम करत असलेले विद्यार्थी, शिक्षक, वैज्ञानिक, कलाकार आणि धोरणकर्ते यांच्यामध्ये भारतभरात प्रेरणा जागवली आहे. १० हजारांहून अधिक पुस्तके आणि एक लाख १५ हजारांपेक्षा अधिक शीर्षके ऑनलाइन पाहू शकतात. हे वैविध्यपूर्ण केंद्र हे पुण्यातील तरुण लोकांसाठी संधींचे केंद्रस्थान ठरेल आणि पुढील ७० वर्षांमध्ये भारताच्या आर्थिक वाढीला चालना देईल.’

नवीन प्रयोगशाळा आणि सांस्कृतिक केंद्रात सुमारे १० हजार पुस्तके, डीव्हीडी, लोकप्रिय ब्रिटिश वृत्तपत्रे आणि नियतकालिके तसेच १ लाख १५ हजार पुस्तके आणि विविध प्रकारच्या विषयांवरील १४ हजार जर्नल्स ऑनलाइन स्वरूपात पाहता आली. केंद्रातील सदस्यांना ब्रिटिश कौन्सिलच्या ऑनलाइन स्त्रोतांचाही अभ्यास करता आला. त्यात सुमारे चार हजार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रे आणि नियतकालिके, स्वतंत्र चित्रपट, मुलांसाठी शिकण्यासाठी गेम्स, सॉफ्टवेअर प्रशिक्षण, कॉमिक्स, ऑडिओ बुक्स आणि जेएसटीओच्या शैक्षणिक जर्नल्सचा समावेश होता.

ब्रिटिश कौन्सिलने अलीकडेच महाराष्ट्र शासनासोबत भागीदारी केली असून, ते सरकारसोबत पद्धतशीर बदलांना चालना देण्यासाठी तसेच शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी, विद्यार्थ्यांवरील परिणाम सुधारण्यासाठी शिक्षणाला समृद्ध बनवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी सुमारे १ लाख शिक्षकांना प्रशिक्षित केले आहे आणि सुमारे ५० लाख विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला आहे. टाटा ट्रस्टसोबत झालेल्या कराराचा भाग म्हणून महाराष्ट्रातील आणखी ३० हजार शिक्षकांना प्रशिक्षित केले जाणार आहे. मागील वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्रातील उच्चशिक्षण संस्थांनी यूके इंडिया एज्युकेशन अँड रिसर्च इनिशिएटिव्हअंतर्गत १२ भागीदारी केल्या आहेत.

अलीकडेच १०० भारतीय महिलांना ब्रिटिश कौन्सिल ७० व्या वर्धापनदिन शिष्यवृत्ती देण्यात आल्या आणि भारतातील संस्थेचा ७० वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. पश्चिम भारतातील १७ विद्वानांपैकी १४ महिला महाराष्ट्रातील असून, त्यांना हा ब्रिटिश कौन्सिलचा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला आहे आणि त्यांचा कार्यक्रमात गौरव कऱण्यात आला. या विदुषी संगणक विज्ञान, जैवशास्त्रीय विज्ञान आणि शरीर विज्ञानासह स्टेम फील्ड्सशी संबंधित विषयात अभ्यास करणार आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link