Next
‘मंदिरांच्या गावा’साठी तरुणाईने रोवली मुहूर्तमेढ
कसबा-संगमेश्वरमधील पुरातन मंदिरांचा ठेवा जपण्यासाठी पुढाकार
संदेश सप्रे
Wednesday, October 31, 2018 | 01:06 PM
15 0 0
Share this article:

दुर्लक्षित मंदिरे

संगमेश्वर :
रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वरमधील तरुणांनी पुढाकार घेऊन चालुक्यकालीन मंदिरांचा ठेवा जतन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. संगमेश्वरजवळच्या कसबा गावात अनेक पुरातन मंदिरे असून, त्यांचा वारसा जपण्यासाठी स्थानिक तरुणांनी मोहीम हाती घेतली आहे. या मंदिरांना नवी झळाळी देण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून हे तरुण काम करणार आहेत. ‘मंदिरांचे गाव’ अशी ओळख कसबा-संगमेश्वरला मिळवून देण्याची त्यांची इच्छा आहे.

संगमेश्व’रजवळच्या कसबा या गावाला ऐतिहासिक महत्त्व आहे. ‘प्रतिकाशी’ म्हणून हा भाग ओळखला जाण्यासाठी पांडवांनी एका रात्रीत ३६० मंदिरे येथे बांधण्याचा संकल्प केला. कोकिळेच्या गुंजनाने तो भंग पावला, अशी आख्यायिका सांगितली जाते. कसब्यातील हा पुरातन मंदिरांचा ठेवा चालुक्यकालीन असल्याचेही मानले जाते. ही मंदिरे सातव्या ते नवव्या शतकात उभारल्याचे काही ठिकाणी नमूद करण्यात आले आहे. हा ठेवा परिसरात मुबलक असणाऱ्या काळ्या दगडांतून घडविण्यात आला आहे. त्यातील अनेक मंदिरे आक्रमणात कोसळली, दुर्लक्षित झाली. कर्णेश्वतर मंदिर वगळता उर्वरित मंदिरे शेवटच्या घटका मोजत आहेत, तर काही मंदिरे झाडाझुडपांनी, गवताने वेढली गेली आहेत. पुरातन, तसेच ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्याची जबाबदारी असलेल्या पुरातत्त्व विभागाकडे डागडुजीसाठी निधी नसल्याने या विभागाकडून पाहणी झाली तरी पुढे काही होत नाही. म्हणूनच स्थानिक ग्रामस्थ आणि परिसरातील तरुणांनी एकत्र येऊन या मंदिरांना नवी झळाळी देण्याचा निर्णय घेतला. यासाठी श्रमदानासह निधी जमविण्याबाबतही काही ठोस निर्णय घेण्यात आले. या कामात मार्गदर्शनासाठी पुणे येथील इतिहासतज्ज्ञ सचिन जोशी यांना बोलावण्यात आले. 

दुर्लक्षित मंदिरांची पाहणी करताना इतिहास अभ्यासक सचिन जोशी आणि त्यांना माहिती देताना स्थानिक कार्यकर्ते संकेत खातू.तरुणांसह ग्रामस्थांचा उत्साह पाहून जोशींनी सर्व मंदिरांची अभ्यासपूर्ण पाहणी केली. याबाबत सचिन जोशी म्हणाले, ‘येथील अद्वितीय मंदिरकलेचे जतन होणे ही काळाची गरज आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मी यासाठी मार्गदर्शन करत आहे. यासाठी मोठा खर्च अपेक्षित असून, स्थानिक ग्रामस्थ आणि तरुणांच्या उत्साहावर हे सर्व काम अवलंबून आहे. मंदिरे सुस्थितीत आणण्याची प्रक्रिया खूप मोठी आहे. या कामासाठी मी सर्वतोपरी सहकार्य करणार आहे.’

या मोहिमेत पुढाकार घेणारे स्थानिक इतिहासप्रेमी तरुण संकेत खातू म्हणाले, ‘मंदिर डागडुजी हा विषय खूप मोठा आणि आव्हानात्मक आहे. सर्वांची प्रामाणिक इच्छाशक्ती असल्याने हे काम पूर्णत्वास नेऊन ‘मंदिरांचे गाव’ म्हणून कसबा-संगमेश्वरची ओळख करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला असून, प्रथम ठोस काम उभे करून दाखविण्याचा आमचा प्रयत्न आहे.’ 

लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा संकेत खातू यांनी व्यक्त केली आहे. 

संपर्क : संकेत खातू – ९९६०३ ०४०५०

(संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर देवस्थानाबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Dharma kondvilkar About 350 Days ago
आपला विचार खुप छान आहे, आपल्या सर्वाच हार्दिक अभिनंदन.....
0
0
Dharma kondvilkar About 350 Days ago
आपला विचार खुप छान आहे, आपण जे कार्य करण्याचे ठरवले आहे त्यासाठी शुभेच्छा व अभिनंदन....... जर का हे कार्य करता वेळी माझा हातभार लागावा असे मला वाटते
0
0
Satish lingayat About 350 Days ago
Yes it's very.The local men's trying to survive the condition of the ancient temples.But the same work need money and permissions
0
0

Select Language
Share Link
 
Search