Next
‘संविधान हे राजकीय नव्हे, तर जगण्याचे साधन’
प्रेस रिलीज
Saturday, June 30, 2018 | 05:06 PM
15 0 0
Share this storyपुणे : ‘सत्तेचा उपयोग करून सामाजिक कायदे करून परिवर्तनीय बदल करणारा माणूस म्हणजे राजर्षी शाहू महाराज. सत्तेत संवेदनशीलता दाखवली पाहिजे. संविधान ही आपली सत्ता आहे. संविधान हे राजकीय साधन नव्हे, तर आपल्या जगण्याचे साधन आहे. किती जणांनी एकत्र बसून यावर चर्चा केलीय किंवा करतात,’ असा प्रश्न सम्यकचे कार्यकारी संचालक आनंद पवार यांनी उपस्थित केला.  

शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व जिजाऊ ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी आणि बारावीतील गुणवंतांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी नुकत्याच केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत यश संपादन केलेल्या मैथिली कोरडे व शिवस्फूर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्ष ॲड. शैलजा मोळक हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे महानगरपालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक होते. या सत्कार समारंभाचे व शिवस्पर्श शैक्षणिक दत्तक योजनेचे हे अकरावे वर्ष होते.

पवार म्हणाले, ‘समाजात समानता आहे हा फार मोठा भ्रम आहे. महिला सबलीकरणाचे कार्यक्रम झाले म्हणजे समानता आली असे नाही, तर मुलगा-मुलगी यांचे मन व मत समानतेच्या दिशेने जाणे गरजेचे आहे.’

मैथिली कोरडे म्हणाल्या, ‘शिक्षण हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा भाग आहे. पालकांनी शिक्षणविषयक कोणताही निर्णय मुलांवर लादू नये. पालकांनी मुलांना पहिल्यापासून योगा, व्यायाम, मेडिटेशन, भरपूर वाचन, स्वतंत्र निर्णय घ्यायची संधी, आवडीचे क्षेत्र निवडीचे स्वातंत्र्य घेऊ द्यावे. मला ते सर्व माझ्या पालकांनी दिले. त्यामुळेच मी हे यश संपादन करू शकले.’

यावेळी दहावी आणि बारावीतील साहिल कुलकर्णी, हिंदवी जगताप, ऋतुजा जाधव, श्रेया आराध्ये, किर्ती भोसले, तन्मय संकपाळ, वरद कुंभार, प्रांजली पांढरे आदी ३० मुलांचा पुस्तके भेट देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी श्रेया आराध्ये, मानसी नेब, संस्कृती राणे या विद्यार्थ्यांनी व कैलास वडघुले या पालकानी मनोगत व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणात पुणे मनपाचे सहआयुक्त मोळक म्हणाले, ‘आपल्या हातात असणाऱ्या मोबाइलमधे जग सामावले आहे; पण त्याचा उपयोग योग्य पद्धतीने करून पुढे जाण्यातच खरा शहाणपणा आहे. प्रतिकूल परिस्थिती व संघर्षाशिवाय यश मिळत नाही. मुलांशी सतत संवाद साधणे आज गरजेचे आहे. आम्ही घरी सर्व कुटुंबीय संसद घेतो. संविधानाप्रमाणे जगण्याचा अधिकार आमच्या घरातील प्रत्येकाला आहे.’

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानच्या अध्यक्ष ॲड. शैलजा मोळक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. स्वप्नील चौधरी यांनी केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link