Next
विद्यार्थ्यांनी काढलेल्या वृत्तपत्रांचे प्रकाशन
‘आनंदविश्व गुरूकूल’मधील पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या मुलांनी मिळवली शाबासकी
प्रशांत सिनकर
Wednesday, April 10, 2019 | 05:16 PM
15 0 0
Share this article:


ठाणे : ‘समाजसेवा, देशसेवा करून, जिद्द, चिकाटी आणि मेहनतीने काम केल्यास यशाचे शिखर गाठता येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे पत्रकारिता. आमच्या काळात ठाण्यात अशी सुविधा उपलब्ध असती, तर पत्रकारितेचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेता आले असते. माझ्यासह अनेकांनी त्याचा लाभ घेतला असता आणि उत्तमोत्तम पत्रकार निर्माण झाले असते,’ असे मत ठाण्याचे ज्येष्ठ पत्रकार संजय पितळे यानी व्यक्त केले. 

येथील ‘आनंद विश्व गुरूकूल ज्येष्ठ रात्र महाविद्यालय’ व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठांतर्गत ‘डिप्लोमा इन जर्नालिझम’च्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून ‘सलाम ठाणे’ आणि ‘प्रतिबिंब’ या वृत्तपत्रांच्या प्रकाशन सोहळ्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ठाण्यातील ‘शारदा एज्युकेशन सोसायटी’च्या आनंद विश्व गुरुकुलांतर्गत जनसंज्ञापन अभ्यासक्रम अर्थात डिप्लोमा इन जर्नालिझमच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना वृत्तपत्र कसे काढावे आणि बातमी कशी लिहावी, कशी पाठवावी, त्यात काय काय अडथळे येतात, याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण म्हणून दोन गट बनवून वृत्तपत्रे काढण्यास सांगितली होती. विद्यार्थ्यांनी ‘सलाम ठाणे’ व ‘प्रतिबिंब’ ही दोन वृत्तपत्रे काढून त्यांचा प्रकाशन सोहळा आयोजित केला होता.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सचिव प्रा. डॉ. प्रदीप ढवळ होते. प्रमुख पाहुणे म्हणून ठाण्याचे ज्येष्ठ पत्रकार, दैवज्ञ प्रकाशचे संपादक, ठाणे जिल्हा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष संजय पितळे यांना आमंत्रित केले होते. या वेळी संस्थेचे सचिव प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, अभ्यासक्रम संयोजक प्रा. शशिकांत कोठेकर, प्राचार्य डॉ. हर्षला लिखिते यांनीही मार्गदर्शनपर भाषणे केली.

महाविद्यालयाचे सचिव प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी अनेक उत्तम उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. ‘अशक्य वाटणाऱ्या गोष्टी पूर्ण करण्याची धडपड ज्याच्यात असते तोच पत्रकार. शांतपणे तलावात विहार करणारे बदकही चहूबाजूंनी फिरत असते; पण त्याची  पाण्यात न बुडण्याची धडपड कुणी पाहत नाही. बदकाचे  पाय नेहमी पाण्यात धडपड करत असतात. पत्रकारही असाच असतो. पत्रकार चौफेर असावा’, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचा शेवट प्रा. ढवळ सर यांनी गायलेल्या पसायदानाने झाला. 

कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता पाटील यांनी केले, तर स्वाती कुलकर्णींसह अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. स्वाती जगताप यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search