Next
‘साईश्री’मध्ये गुडघा प्रत्यारोपण सेवा कार्यान्वित
प्रेस रिलीज
Monday, April 16, 2018 | 05:24 PM
15 0 0
Share this story

औंध : प्रख्यात हिप आणि नी रिप्लेसमेंट सर्जन डॉ. नीरज आडकर यांच्या प्रयत्नांतून औंध येथील साईश्री हॉस्पिटलमध्ये नी रिप्लेसमेंट सर्जरी अंतर्गत ‘ऑप्युलेंट’ ही हाय फ्लेक्सीऑन गोल्ड नी जॉइंट सिस्टीम विशेष शस्त्रक्रियेसाठी कार्यान्वित करण्यात आली आहे. युनायटेड स्टेटसमधील डॉ. कार्ल बेकर यांच्या उपस्थितीत ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

अद्वितीय अशी बायोकंपाटीबीलिटी, कोणत्याही एलर्जीपासून रक्षण करणारे, कोबाल्ट क्रोमियमनेयुक्त मिश्र धातूपेक्षा अधिक कडक असते. जोडलेल्या भागाचे कमी घर्षण, दीर्घकाळ टिकणारी केमिकल स्थिरता, कृत्रिम अवयवामुळे होणारी वेदना आणि दाह रोखला जातो. उच्चतम क्षमतेसह सायनोव्हियल फ्लुईड, अतिशय घट्ट धरून ठेवण्याची क्षमता हे ‘ऑप्युलेंट’ बायोइंक गोल्ड तंत्राचे फायदे आहेत.

‘ऑप्युलेंट’ बायोनीक गोल्ड सरफेस हे प्रामुख्याने गुडघा प्रत्यारोपणामध्ये एलर्जी आणि वेअर संरक्षणासाठी वापरले जाते. सुक्ष्मरीतीने पाहिले असता बायोनीक गोल्ड सरफेस हे धातुमय, फिकट सोनेरी पिवळ्या रंगात येते, तसेच कोटिंग फॉर्म इम्प्लांट घट्ट धरून ठेवण्याचे काम करतात. याशिवाय ‘ऑप्युलेंट’ गोल्ड नी सर्जरीमध्ये कोबाल्ट-क्रोमियम- मोलिब्डेनम यांचे मिश्रण (CoCrMo) ही सारी महत्त्वाची घटकद्रव्ये हाडांशी संबंधित उपकरणांमध्ये वापरली जातात.

‘गुडघ्याच्या प्रत्यारोपणासाठी 'CoCrMo' हे अतिशय प्रभावी माध्यम असून, गेक्या दशकभरापासून याचा सर्रास वापर केला जातो. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर म्हणून टीनबीएन या घटकाचा वापर केला जातो. यामुळे सांध्यामधील लवचिकता राखण्यास मदत होते’, असे बायोकंपा ओर्थोपेडीक सर्जरीमध्ये एमडी केलेल्या डॉ. कार्ल बेकर यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘भारतात हाडांचे आरोग्य ही एक मोठी समस्या आहे. येथील अनेक लोक पोषकद्रव्ये, व्हिटामीन्स, मिनरल्स यांच्या माध्यमातून हाडे सक्षम होतात याविषयी अद्याप खूप मोठी अन टीबीलीटी आणि दीर्घकाळ टिकण्यासाठी त्याचा उपयोग होतो. सर्जरीमध्ये जे प्रत्यारोपण वापरले जाते त्यात सोनेरी रंगाचे टीटेनियम-नायट्राइड/झीर्कोनियम नायट्राइड यांचे कोटिंग असते. गोल्डन नी इम्प्लांटमुळे कोणत्याही प्रकारच्या एलर्जीपासून संरक्षण होते; तसेच हे अधिक टिकाऊ आणि दीर्घकाळ टिकणारे असे आहे. गुडघ्याचे प्रत्यारोपण भिज्ञता आहे.’  

‘गुडघा प्रत्यारोपणासाठी व्यक्तीची निवड ही वयाच्या निकषावर होत नसते. त्या व्यक्तीला त्याच्या वेदना किती होत आहे आणि त्याच्या हालचालींवर किती मर्यादा आल्या आहेत यावर ठरते. सांध्यांमध्ये खूप वेदना होत असतील, तर त्यासह दैनंदिन कामे करणे आणि सामान्य गोष्टीमध्ये सहभागी होणे यावर बंधने येतात. त्यामुळे रुग्णांसाठी  ‘ऑप्युलेंट’ नी तंत्रज्ञान हा सर्वोत्तम पर्याय आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर अवघ्या काही आठवड्यामाध्येच बहुतांश रुग्ण त्यांच्या दैनंदिन गोष्टी करू शकतात’, असे डॉ. नीरज आडकर यांनी सांगितले.

‘भारतात, लोकांची जीवनशैलीच अशी असते की लोकांच्या गुडघ्याचा वापर अधिक केला जातो. त्यातून भारतातील अनेक लोक व्यायाम कमी करतात; तसेच त्यांची हाडेही कमकुवत असतात. अशा सर्व लोकांच्या गुडघ्याचे प्रत्यारोपण करण्याची गरज निर्माण होते,’ असे डॉ. आडकर म्हणाले.

हिप आणि नी रिप्लेसमेंट सर्जन डॉ. आडकर हे गुडघा प्रत्यारोपण यातील जाणकार असून, दर वर्षी अशा अनेक केसेस ते हाताळतात. त्यांचे त्यांच्या क्षेत्रातील अद्वितीय असे कौशल्य, रुग्णाची ते घेत असलेली काळजी, शिक्षण आणि संशोधन आदी विषयातील कुशलतेविषयी प्रख्यात आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link