Next
वक्तृत्व स्पर्धेत पखाले, कीर्तिकर प्रथम
BOI
Wednesday, February 27, 2019 | 05:22 PM
15 0 0
Share this article:

डॉ. पतंगराव कदम राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांसह डॉ. सचिन वेर्णेकर व अन्य मान्यवर

पुणे : भारती अभिमत विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी ) आयोजित डॉ. पतंगराव कदम राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत हृषीकेश पखाले, किरण कीर्तिकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. निकिता पाटील, उद्देश कृष्णा पवार यांना द्वितीय, तर अंजली रावत, सागर यांना तृतीय क्रमांक मिळाला. वैभव मेहता, अलिशा मेमन यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. 

या वक्तृत्व स्पर्धेसाठी, डॉ. पतंगराव कदम - एक द्रष्टा नेता, भारताचे अर्थशास्त्र : समस्या आणि उपाय, धर्म आणि राजकारण, बेरोजगारीचा राक्षस, स्वच्छतेतून विकास, भारतीय शिक्षण पद्धतीसमोरील आव्हाने व उपाय असे विषय देण्यात आले होते. 

‘आयएमईडी’चे संचालक आणि भारती विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता डॉ. सचिन वेर्णेकर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. प्रथम क्रमांक विजेत्याला दहा हजार रुपये रोख, द्वितीय क्रमांकासाठी सात हजार आणि तृतीय क्रमांकासाठी पाच हजार रुपये रोख बक्षीस देण्यात आले.                                                         
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search