Next
वुमन्स आर्टिस्ट ग्रुपतर्फे चित्रशिल्प प्रदर्शन
पुलं, गदिमा आणि बाबूजी यांना मानवंदना
BOI
Friday, January 25, 2019 | 01:17 PM
15 0 0
Share this article:

पुणे : महाराष्ट्राचे वाल्मिकी ग. दि. माडगूळकर, ज्येष्ठ संगीतकार, गायक सुधीर फडके आणि महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘वुमन्स आर्टिस्ट ग्रुप’तर्फे चित्रशिल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 

‘यामध्ये पुलं, गदिमा आणि बाबूजी यांची महिला चित्रकारांनी रेखाटलेली चित्रे, अक्षरलेखन, निसर्गचित्रे, मूर्त, अमूर्त शैलीतील विविध चित्रे, शिल्पकृती पाहायला मिळतील. कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या कलादालनात एक फेब्रुवारीपासून ते तीन फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन भरणार असून, सकाळी साडे दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत ते सर्वांसाठी खुले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञ गिरीजा कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे,’ अशी माहिती संयोजक सीमा खेडकर शिर्के आणि स्वप्ना जोशी यांनी दिली. 

कार्यक्रमाविषयी :
चित्रशिल्प प्रदर्शन 
स्थळ : यशवंतराव चव्हाण कलादालन, कोथरूड  
दिवस व वेळ : एक ते तीन फेब्रुवारी, सकाळी साडे दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Darshana V. Shah About 262 Days ago
Nice
0
0

Select Language
Share Link
 
Search