Next
‘आयपीसी’मध्ये मोफत तपासणी शिबिर
प्रेस रिलीज
Friday, September 21, 2018 | 03:46 PM
15 0 0
Share this story

पुणे : इन्स्टिट्यूट फॉर प्रोस्टेट कॅन्सरमार्फत २५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

‘भारतात प्रोस्टेट कॅन्सरविषयी जागरूकता नसल्याने जवळपास ६० टक्के रुग्ण डॉक्टरांना भेटतात जेव्हा ते शेवटच्या टप्यावर पोहचलेले असतात. प्रोस्टेट कॅन्सर हा अत्यंत हळू गतीने वाढत असून, अखेर प्राणघातक ठरतो त्यामुळे त्याचे प्राथमिक टप्प्यात निदान होऊन त्यावर उपचार होणे अत्यंत महत्त्वाचे आहे,’ असे इन्स्टिट्यूट फॉर प्रोस्टेट कॅन्सरचे (आयपीसी) कन्सल्टंट युरोलॉजीस्ट डॉ. हृषीकेश देशमुख यांनी सांगितले.

‘आयपीसी’ मागील पाच वर्षांपासून प्रोस्टेट कॅन्सर आणि त्याचे निदान करण्यासाठी उपलब्ध अत्याधुनिक तंत्रज्ञानाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे ज्यात ५० हजारांहून अधिक लोकांची जनजागृती करण्यात आली आहे. भविष्यात प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी ५० वर्षांपुढील पुरुषांनी पीएसए आणि डीआरई तपासणी करण्याचा सल्ला ‘आयपीसी’ने दिला असून, कोणत्याही प्रकारच्या पाठदुखीकडे दुर्लक्ष करू नये असे देखील सुचवले आहे. वेळेत निदान झाले, तर हा कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो.

प्राथमिक टप्प्यात निदान झाल्यास रुग्ण १०० टक्के बरा होऊ शकतो. उशीर झाल्यास प्रोस्टेट प्राणघातक ठरू शकतो त्यामुळे तुमच्या सततच्या पाठदुखीवर दुर्लक्ष न करता प्रोस्टेट वेळीच चेक करण्याचा सल्ला डॉ. देशमुख यांनी दिला.

शिबिराविषयी :
कालावधी :
२५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०१८
वेळ : अपॉईंटमेंटनुसार
ठिकाण : इन्स्टिट्यूट फॉर प्रोस्टेट कॅन्सर, ग्राउंड फ्लोअर, कुमार– दी ओरायन, सेंट मिराज कॉलेजजवळ, डॉनबॉस्को युथ सेंटरच्या विरुद्ध, कोरेगाव पार्क, पुणे
संपर्क : ७७९८५ ७७५६३, (०२०)-६६०३ ७७७७/७८
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link