Next
‘कॅशई’ची ‘बँकबाजार डॉट कॉम’शी भागीदारी
प्रेस रिलीज
Tuesday, June 05, 2018 | 06:20 PM
15 0 0
Share this story

मुंबई : भारतातील हजारो तरुण पगारधारकांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या ‘कॅशई’ या डिजिटल लेंडिंग कंपनीने ‘बॅंक बाजार डॉट कॉम’ यांच्याशी भागीदारी केली आहे. भारतातील आघाडीचे तटस्थ ऑनलाइन मार्केटला असलेल्या ‘बॅंक बाजार’च्या माध्यमातून त्यांच्या वेबसाइटवर अल्प मुदतीची वैयक्तिक कर्जे उपलब्ध केली जाणार आहेत.

या भागीदारी करारा अंतर्गत ‘बॅंक बाजार’च्या युजर्सना अल्प मुदतीची कर्ज सुविधा तातडीने सहजरीत्या उपलब्ध होतील. ‘कॅशई’मार्फत १० हजार रुपयांपासून दोन लाख रुपयांपर्यंत विविध कर्जाच्या योजना दिल्या जातात. त्यांची मुदत १५, ३०, ९० आणि १८० दिवस अशी आहे.

‘कॅशई’ कंपनी महिन्याला २७ हजारांहून अधिक कर्जाच्या अर्जांची प्रक्रिया करते आणि एप्रिल २०१६पासून कंपनीचे अॅप १.८ दशलक्ष वेळा डाउनलोड करण्यात आले आणि त्याद्वारे एकूण ४०० कोटी रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले. मार्च २०१९पर्यंत एकूण ९०० कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे.

या भागीदारी बद्दल बोलताना अॅरिज फायनान्शियल टेक्नॉलॉजीस् चे अध्यक्ष व्ही. रमनकुमार म्हणाले, ‘बॅंक बाजार डॉट कॉमशी भागीदारी करताना आम्ही उत्साही होतो. ‘कॅशई’ला बॅंक बाजारचा प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे. याच्या माध्यमातून आमचे ग्राहक इतर वित्तीय संस्थांमार्फत दिल्या जाणाऱ्या विविध वैयक्तिक कर्जाची तुलना आमच्या उत्पादनांशी करू शकतील. ‘बॅंक बाजार डॉट कॉम’च्या ग्राहकांना आता रिटेल लोन या श्रेणीत ‘कॅशई’च्या उत्कृष्ट आणि अभिनव उत्पादनांचा लाभ घेता येईल.’

‘तटस्थ अशी ऑनलाइन मार्केट प्लेस असलेल्या ‘बॅंक बाजार’ला २०१८ च्या शेवटच्या तिमाहीत ९० दशलक्ष जणांनी भेट दिली. हे लक्षात घेता आमची ग्राहक संख्या विस्तारण्यासाठी ही भागीदारी सहाय्यभूत ठरेल. वित्तीय सेवा खरेदी करणाऱ्या भारतीय ग्राहकांच्या दृष्टीने बॅंक बाजार महत्त्वपूर्ण ठरते. पुरेसे क्रेडिट रेटिंग नसल्याने इतर कर्जपुरवठादार कंपन्यांकडून कर्ज मिळू न शकलेल्या ग्राहकांना या भागीदारी चा लाभ होईल असा आम्हाला विश्वास आहे. ‘कॅशई’ला सामाजिकतेचे भान असल्याने या ग्राहकांना अल्प मुदतीची विविध वैयक्तिक कर्जे तातडीने उपलब्ध करून देऊ शकते,’ असे रमनकुमार यांनी सांगितले.

‘बॅंक बाजार’चे मुख्य व्यवसायवृध्दी अधिकारी नवीन चंदानी म्हणाले, ‘बॅंक बाजार डॉट कॉमच्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर वित्तीय उत्पादने उपलब्ध व्हावीत हेच आमचे लक्ष्य आहे. ‘कॅशई’सारख्या फिनटेक कंपनीशी करार करणे हे त्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. वित्तीय संस्था नियमितपणे मध्यम ते दीर्घ मुदतीची कर्ज उत्पादने ग्राहकांना देऊ करतात. त्यामुळे आमचे ग्राहक त्याला पात्र ठरत नव्हते. पण आता ‘कॅशई’च्या सहभागामुळे त्यांना अल्प मुदतीची वैयक्तिक कर्जे मिळू शकतील. ‘कॅशई’सारख्या तत्पर आणि डिजिटली परिपूर्ण अशा संस्थेशी करार केल्याने आम्ही या भागीदारीबद्दल सकारात्मक आहोत. सहजगत्या आणि तातडीने मोठ्या प्रमाणावर कर्जे दिली जात असल्याचे आम्हाला दिसले.’

मोबाईल अॅपवरच कागदपत्रांची पूर्तता केल्यावर मंजुरीची प्रक्रिया अवलंबली जाते आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय कॅशई कर्ज उपलब्ध करते. सोशल लोन कोशंट (एसएलक्यू) या क्रेडिट स्कोअरिंग गणना पद्धतीच्या आधारे ही प्रक्रिया होते. वैशिष्ट्यपूर्ण, विविध डाटा पॉइंटस्च्या आधारे ग्राहकाचे क्रेडिट प्रोफाईल तपासून तो कर्जाची परतफेड करू शकेल की नाही याची लगेच खातरजमा केली जाते. ‘एसएलक्यू’च्या माध्यमातून पारंपरिक क्रेडिट रेटिंग पडताळून तरुण प्रोफेशनलस्ना लगेच कर्ज पुरवठा केला जातो. इतर पारंपरिक क्रेडिट रेटिंग पद्धती आणि बॅंकिंग प्रणालीमुळे या तरुणांना कर्ज मिळू शकत नाही. ‘कॅशई’ ही प्रणाली पूर्णपणे स्वयंचलित असून, त्यात वैयक्तिक हस्तक्षेप करावा लागत नाही; तसेच प्रत्यक्षात कागदपत्रे सादर करावी लागत नाहीत. सर्व कागदपत्रे सादर केल्यानंतर कर्ज वाटपासाठी सरासरी आठ मिनिटे लागतात.

‘कॅशई’विषयी :
‘कॅशई’ ही भारतातील पगारदार तरुणांच्या सर्वाधिक पसंतीची डिजिटल लेंडिंग कंपनी आहे. तरुणांचे सोशल प्रोफाईल गुणवत्ता आणि उत्पन्न क्षमता याची पडताळणी आपल्या गणनपद्धती मार्फत केल्यावर ‘कॅशई’ तातडीने अल्प मुदतीचे वैयक्तिक कर्ज देते. अॅरिज फायनान्शियल टेक्नॉलॉजीसने एप्रिल २०१६मध्ये अनोख्या तंत्रज्ञानावर आधारित लेंडिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध केला. यासाठी शहरी भागातील तरुणांना कर्ज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

मागणीनुसार तात्काळ कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्याच्या युजर फ्रेंडली प्रणालीमुळे लोन मंजूरी प्रक्रिया वेगाने होते आणि कर्जाचे वाटपही केले जाते. अॅपद्वारे कागदपत्रांची सादरीकरण केल्यावर ‘कॅशई’ विना अडथळा कर्जाचे वाटप करते; तसेच परतफेडीची प्रक्रियाही सुलभ आहे. ‘कॅशई’चा २३ ते ३५ वर्ष वयोगटातील तरुण नोकरदार प्रोफेशनल हे मुख्य ग्राहक आहेत. १० हजार ते दोन लाख रुपयांची कर्जे १५ ते १८० दिवसांसाठी दिली जातात.

‘बॅंक बाजार डॉट कॉम’विषयी :

इंटरनेट अॅंड मोबाइल असोसिएशन ऑफिसर इंडियानुसार (आयएएमएआय) ‘बॅंक बाजार डॉट कॉम’ला उत्कृष्ट वित्तीय वेबसाइटचे मानांकन आहे; तसेच सीएमओ एशियाद्वारे आशियातील उत्कृष्ट ब्रॅंड म्हणून त्याची ओळख बनत आहे. भारतातील पहिली तटस्थ ऑनलाइन मार्केट प्लेस असून त्याद्वारे कर्जे, क्रेडिट कार्ड किंवा इतर वैयक्तिक वित्तीय उत्पादनांचे दर तत्काळ उपलब्ध होतात. कर्जाच्या अर्जाची प्रक्रिया अतिशय सुलभ आहे. कोणीही याच्या माध्यमातून उपलब्ध आॅफर्स,  त्यांची तुलना, त्याच्या किंवा तिच्या गरजेनुसार उपलब्धता तपासता येते आणि त्या वित्तीय उत्पादनासाठी अर्ज करता येतो. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने याचे डिझाईन करण्यात आले असून, भारतातील ८५ हून अधिक आघाडीच्या वित्तीय संस्था आणि विमा कंपन्या यात सहभागी झाल्या आहेत. ऑनलाइनच्या या जमान्यात शॉपिंगप्रमाणे ऑनलाइन बॅंकिंग सेवेलाही प्राधान्य दिले जाते. विशेष म्हणजे बॅंक बाजारच्या सेवा पूर्णतः नि:शुक्ल आहेत.

‘बॅंक बाजार’ सेवा वेब पोर्टल आणि मोबाईल आधारित वेबवर उपलब्ध आहे. याशिवाय अॅंड्रॉइड प्ले स्टोअर आणि आयओएस अॅप स्टोअर यावर बॅंक बाजारचे अॅप उपलब्ध आहे. ग्राहकांना विविध बॅंका आणि एनबीएफसीच्या विविध उत्कृष्ट योजनांची तुलना करता येते; तसेच ग्राहकांना ताज्या बातम्या/ ट्रेंड्स आणि वित्तीय व्यवस्थापनाचे तपशील पुरवले जातात. बॅंक बाजार अॅप, व्हाट्स अॅप, ईमेल, व्हॉइस सपोर्ट आदींद्वारे ग्राहकांना अर्जाची सद्यस्थिती, प्रक्रियेत येणाऱ्या समस्यांचे निराकरण करता येते.

भारताव्यतिरिक्त ‘बॅंक बाजार’चे सिंगापूर आणि मलेशिया येथे कार्यालय आहे. बॅंक बाजार डॉट एसजी २०१६मध्ये, तर बी बाजार डॉट एमवाय २०१७मध्ये कार्यान्वित झाली. याच्याशी सहयोगी बॅंकांना व्यवहार पूर्णपणे याद्वारे केले जातात.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link