Next
‘अन्नपूर्णा परिवारा’चा स्थापनादिन साजरा
BOI
Monday, September 03 | 04:19 PM
15 0 0
Share this story

‘अन्नपूर्णा परिवारा’च्या स्थापनादिनी एम. के. दातार लिखित ‘फ्युचर ऑफ पब्लिक सेक्टर बँक इन इंडिया’ पुस्तक व ‘संवाद’ मासिकाच्या प्रकाशनप्रसंगी देवीदास तुळजापूरकर, सुरेश धोपेश्वरकर, मेधा सामंत, भालचंद्र कानगो आदी मान्यवर.

पुणे : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विशेषतः महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुणे व मुंबई येथे वस्तीपातळीवर काम करणाऱ्या ‘अन्नपूर्णा परिवारा’चा स्थापनादिन नुकताच संस्थेचे संस्थापक दादा पुरव उर्फ नरेंद्र पुरव यांच्या स्मृतिदिनी साजरा करण्यात आला. 

या वेळी प्रमुख पाहुणे ‘ऑल इंडिया बँक’चे संयुक्त सचिव देवीदास तुळजापूरकर यांच्या हस्ते आय. डी. बी. आय बँकचे माजी महाव्यवस्थापक एम. के. दातार यांनी लिहिलेल्या ‘फ्युचर ऑफ पब्लिक सेक्टर बँक इन इंडिया’ या  पुस्तकाचे  व ‘संवाद’  मासिकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश धोपेश्वरकर होते. ‘आयओबी’ बँकेचे प्रमुख क्षेत्रीय व्यवस्थापक व्ही. सी. जोशी, कॉम्रेड भालचंद्र कानगो, श्री. मोहन्तो, वंदना सावडी आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

या वेळी बोलताना देवीदास तुळजापूरकर म्हणाले,‘आताचा काळ हा अतिशय महत्वाचा आहे,पण बँकेत होणारे घोटाळे हे बँकांसाठी घातक ठरत आहेत. यासाठी सरकारने त्यांचे खासगीकरण करणे हा उपाय नाही, तर मोठ्या उद्योजकांनी बुडवलेले पैसे त्यांच्याकडून वसूल करणे व बँका जास्त लोकाभिमुख करणे हा आहे.’
डॉ. मेधा सामंत पुरव

या वेळी ‘अन्नपूर्णा परिवारा’च्या अध्यक्षा डॉ. मेधा सामंत पुरव म्हणाल्या, ‘दादा पुरव रिसर्च सेंटर’ची कायदेशीर नोंदणी झाली असून, संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे, पुस्तके प्रकाशित करणे ही कामे करण्यात येत आहेत. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या दादा पुरव यांना सामान्य नागरिकांसाठी देशाच्या स्वातंत्र्याबरोबरच आर्थिक स्वातंत्र्यदेखील महत्वाचे आहे, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांना एकत्र आणून, ‘ऑल इंडिया बँक एम्प्लॉयी असोसिएशन’ची स्थापना केली आणि सर्वसामान्य जनतेच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी प्रयत्न सुरू केले. आता पाच सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून हे कार्य सुरू आहे. ‘दादा पुरव रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’मध्ये विशेष अभ्यासक्रम, संशोधन व संलग्न उपक्रम चालतात.’ 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link