Next
भिवंडी-पडघा येथील पूरग्रस्तांना ‘मनसे’च्या वतीने धान्यवाटप
BOI
Tuesday, August 06, 2019 | 06:23 PM
15 0 0
Share this article:

धान्यवाटप करताना ‘मनसे’चे पदाधिकारी

भिवंडी :
ठाण्याच्या भिवंडी तालुक्यातील पडघा येथील पूरग्रस्तांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने धान्यवाटप करण्यात आले. त्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.

संततधार पावसामुळे पडघा येथील ओहळाशेजारी असणाऱ्या गणेशनगर येथील कामगारांच्या वस्तीत मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. त्यामुळे अनेक नागरिकांच्या घरातील धान्य, जेवण बनवण्याचे साहित्य भिजले. त्यामुळे नागरिकांवर उपासमारीची वेळ आली होती. ही बाब ‘मनसे’च्या पदाधिकाऱ्यांना समजताच भिवंडी लोकसभा क्षेत्रातील शहापूर-भिवंडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष शैलेश बिडवी, पंचायत समिती उपसभापती वृषाली विशे, विधानसभा सचिव रवींद्र विशे, तालुका संघटक रोहिदास पाटील, रोजगार स्वयंरोजगार पदाधिकारी गुरुनाथ मते, ग्रामपंचायत सदस्य गुरुनाथ मोरे, श्वेता बिडवी यांनी ७५ पूरग्रस्तांना तांदूळ, साखर, तेल, चहा पावडर, तूरडाळीचे वाटप केले. तसेच ‘मनसे’च्या कार्यालयात त्यांची निवासाची व्यवस्था केली. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search