Next
अंजुरफाटा जिल्हा परिषद मराठी शाळेत शिवसप्ताह
मिलिंद जाधव
Tuesday, February 19, 2019 | 01:25 PM
15 0 0
Share this article:भिवंडी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अलौकिक पराक्रमाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी या हेतूने शिवजयंतीचे औचित्य साधून भिवंडी तालुक्यातील अंजुरफाटा जिल्हा परिषद शाळेत १९ फेब्रुवारीपर्यंत शिवसप्ताह उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन आठगाव विद्यामंदिर कोन येथील सेवानिवृत्त प्राध्यापक शिवश्री श्रीराम पाटील यांच्या व्याख्यानाने करण्यात आले. व्याख्यानात माहिती देताना ते म्हणाले, ‘शिवराय हे सर्वधर्मसमभाव पाळणारे, तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणारे पहिले राजे होते. शिवराय व राजमाता जिजाऊ यांचे जीवनचरित्र अभ्यासून प्रत्येक विद्यार्थाने आपले मन, मेंदू व मनगट बळकट बनवावे. खेळाची विशेषतः कुस्ती, कबड्डी, खो-खो या आपल्या मातीतील खेळाची आवड जोपासून बलवान बनावे आणि हे बळकट शरीर देशसेवेसाठी उपयोगात आणावे.’या सप्ताहात जो वर्ग उत्कृष्ट सादरीकरण करणार त्यांना व त्यांच्या शिक्षकांना एक हजार रुपयांचे पारितोषिक देण्याचे जाहीर करतानाच पाटील यांनी अंजुरफाटा शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता गायकवाड व शिक्षक राबवत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. या प्रसंगी मुख्याध्यापिकांच्या हस्ते पाटील यांना ग्रंथ भेट देण्यात आला. सूत्रसंचालन बाबासाहेब राऊत यांनी केले. विजयकुमार जाधव यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search