Next
सर्वोत्तम भूमिपुत्र : गोतम बुद्ध
BOI
Tuesday, June 18, 2019 | 10:23 AM
15 0 0
Share this article:

‘माझ्या धम्माचा ईश्वर, आत्मा, कर्मकांड व मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा माझ्या धम्माचा केंद्रबिंदू आहे,’ असे भगवान बुद्ध यांनी म्हटले आहे. या नव्या धम्मातून बुद्धांनी सामाजिक क्रांतीचे काम केले. बुद्ध, बुद्धविचार व बुद्धांचे कार्य याचा परिचय डॉ. आ. ह. साळुंखे यांनी ‘सर्वोत्तम भूमिपुत्र : गोतम बुद्ध’ या पुस्तकातून करून दिला आहे. याच पुस्तकाची संक्षिप्त आवृत्ती प्रा. डॉ. प्रशांत गायकवाड यांनी वाचकांसमोर ठेवली आहे. यात सिद्धार्थाच्या जन्माची कथा, गोतम या नावाची उकल, बुद्धत्वप्राप्ती म्हणजे काय, तथागत, भगवान, सुगत, श्रवण या शब्दांचे अर्थ, गोतमाच्या गृहत्यागामागील कारणे, चार अरिय सत्ये, आत्मा, कर्म, पुनर्जन्म, भिक्खू संघाची निर्मिती, यशोधरा यांचा त्याग, वज्जींचा उपदेश, कालामसूक्तमधील उपदेश, बुद्धांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन, बुद्धांवरील आक्षेप, तिपिटकातील प्रक्षिप्त सुत्ते, मिथकांची वस्तुनिष्ठ उकल, दैवी चमत्कार व कर्मकांडापासून बुद्ध तत्त्वज्ञानाची सुटका अशा अनेक विषयांवरील भाष्य या पुस्तकात आहे.

पुस्तक : सर्वोत्तम भूमिपुत्र : गोतम बुद्ध
लेखक : डॉ. आ. ह. साळुंखे
प्रकाशन : लोकायत प्रकाशन
पृष्ठे : २४०
मूल्य : २५० रुपये

(‘सर्वोत्तम भूमिपुत्र : गोतम बुद्ध’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 23 Days ago
People praise him , glorify him . Does anybody read his writings ? How many can ? In the original ? The language is different , the script is different . And , more important , how many are interested in philosophy ?
0
0
BDGramopadhye About 24 Days ago
He struggled against : Ritualistic religion , and monopoly of knowledge . Were his philosophical thoughts different from those in the established religion ?
0
0

Select Language
Share Link
 
Search