Next
‘डीकेटीई’च्या विद्यार्थ्यांचे लिब्रेस येथे प्रशिक्षण
प्रेस रिलीज
Monday, June 25 | 11:49 AM
15 0 0
Share this story

युनिर्व्हसिटी ऑफ लिब्रेस, झेक रिपब्लिक येथे प्रशिक्षण घेत असलेल्या ‘डीकेटीई’च्या विद्यार्थ्यांसमवेत युनिव्हर्सिटीचे प्रा. जेरी मिलिटकी व प्रा. राजेश मिश्रा.इचलकरंजी : येथील डीकेटीई संस्थेतील टेक्स्टाइल विभागात शिक्षण घेणाऱ्या चार विद्यार्थ्यांची युनिव्हर्सिटी ऑफ लिब्रेस, झेक रिपब्लिक या विद्यापीठामध्ये एक महिना कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. लिब्रेस विद्यापीठातर्फे देशातील विविध इन्स्टिट्यूटला भेटी देऊन इच्छुक विद्यार्थ्यांची विविध चाचणीद्वारे बौद्धिक पातळी व संशोधन वृत्ती तपासली जाते. त्यात्तून जगभरातील विद्यार्थ्यांची लिब्रेस येथे प्रशिक्षणासाठी निवड केली जाते. सलग तीन वर्षे ‘डीकेटीई’चे विद्यार्थी लिब्रेस येथे प्रशिक्षण घेत आहेत.

डीकेटीई इन्स्टिट्यूट आणि टेक्निकल युनिव्हर्सिटी, लिब्रेस यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला आहे. या कराराअंतर्गतच ‘डीकेटीई’चे विद्यार्थी दीपक कडवा, सुरज सुतार, शुभम पाटील व टी. एम आक्षत हे एक महिना कालावधीसाठी झेक रिपब्लिक येथे प्रशिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना टेक्निकल टेक्स्टाइल्स, इनोव्हेटीव्ह टेक्स्टाइल्स, फिनिशिंग, सस्टेनेबल टेक्स्टाइल्स बिझनेस या विषयावर प्रशिक्षण कालावधीमध्ये अभ्यास करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण कालावधीमध्ये टेक्निकल टेक्स्टाइल टेस्ट करणाऱ्या सर्व सामुग्री व त्यांच्या विविध पद्धतींचे देखील ज्ञान अवगत होत आहे.

या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थी जगभरातील विविध रिसर्च तज्ज्ञांशी विचारविनिमय करीत आहेत व त्यामुळे त्यांच्या संशोधन वृत्तीला चालना मिळत आहे. प्रशिक्षण कालावधीमध्ये विद्यार्थी लिब्रेस येथील रिसर्च इन्स्टिट्यूट व इंडस्ट्रीजना भेट देत आहेत. एकूणच हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी उपयुक्त ठरले आहे.

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण निवडीसाठी व त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी लिब्रेस युनिव्हर्सिटीचे प्रा. डॉ. जेरी मिलिटकी व प्रा. राजेश मिश्रा यांनी ‘डीकेटीई’ला भेट दिली आणि वैयक्तिक मुलाखतीद्वारे या विद्यार्थ्यांची युनिव्हर्सिटी ऑफ लिब्रेस येथे प्रशिक्षणासाठी निवड केली. ‘डीकेटीई’च्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेने प्रशिक्षण कालावधीमध्ये विदेशातील तज्ञांना प्रभावित केले असून, जागतिक पातळीवर ‘डीकेटीई’चे तसेच इचलकरंजीचे नाव उज्ज्वल केले आहे. शिक्षणाबरोबरच प्रात्यक्षिकावर असलेला भर यामुळे विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी वाढल्याने लिब्रेसमध्येही ‘डीकेटीई’च्या विद्यार्थ्यांची छाप पडली आहे. या विद्यार्थ्यांना डीकेटीई इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, उपसंचालक प्रा. डॉ. यू. जे. पाटील, प्रा. डॉ. एम. वाय. गुडियावर यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. यामध्ये ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. एस. बी. अकीवाटे यांचा अनमोल वाटा आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link