Next
‘युथकॉन टेकपर्व’ प्रकल्प स्पर्धेचे आयोजन
प्रेस रिलीज
Thursday, April 05 | 03:37 PM
15 0 0
Share this story

पुणे : युथकॉन क्रिएटीव्ह सोल्युशन्स, रोटरी क्लब ऑफ पुणे रॉयल, सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ इंजिनीरिंग आणि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युथकॉन टेकपर्व २०१८’ राज्यस्तरीय अभियांत्रिकी प्रकल्प स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवारी (ता. १०) सकाळी नऊ वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. मेकॅनिकल, कॉम्पुटर, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स व केमिकल शाखेतील द्वितीय, तृतीय व अंतिम वर्षाचे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रकल्पाचे मॉडेल, संकल्पना, उद्दिष्टे व त्याच्याशी संबंधित तांत्रिक माहिती संकलित स्वरूपात सोबत आणावी. या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रथम व द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक रोख रकमेच्या स्वरूपात देण्यात येईल.

उद्योग क्षेत्रातील विविध मान्यवर मंडळी सहभागी स्पर्धकांच्या मूल्यांकनाचे काम पाहतील. या वेळी प्राचार्य डॉ. अ. वि. देशपांडे, उपप्राचार्य डॉ. किशोर बोरोले व विभागप्रमुख प्रा. एन. पी. शेरजे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. ‘युथकॉन क्रिएटीव्ह’तर्फे संचालिका प्रज्ञा वाघ व आशिष एकतपुरे या स्पर्धेचे आयोजन करीत आहेत. रोटरी क्लब ऑफ पुणे रॉयलतर्फे माजी अध्यक्ष रोटेरियन प्रशांत देशपांडे, जयंत राजपूत व उदय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली क्लबचे अध्यक्ष विशाल गुंजाळ आणि सचिव अजय चौधरी समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.

अधिक माहितीसाठी : www.youthcon.co.in 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link