Next
महिला लेखापालांसाठी दोन दिवसीय परिषद
प्रेस रिलीज
Tuesday, August 21 | 06:29 PM
15 0 0
Share this story

महिला लेखापालांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेबाबत माहिती देताना ऋता चितळे व रेखा धामणकर.
पुणे : ‘महिला लेखापालांच्या वैयक्तिक विकासासाठी ‘दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस ऑफ इंडिया’च्या (आयसीसीआय) पुणे व पिंपरी-चिंचवड विभाग आणि ‘कमिटी फॉर कपॅसिटी बिल्डिंग ऑफ मेंबर्स इन प्रॅक्टिस’ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला लेखापालांसाठी दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. एक आणि दोन सप्टेंबर रोजी सकाळी साडे नऊ ते सायंकाळी साडे पाच या वेळेमध्ये बाणेर रस्त्यावरील यशदा प्रशिक्षण केंद्रामध्ये ही परिषद होणार आहे’,अशी माहिती ‘आयसीएआय’च्या उपाध्यक्षा व परिषदेच्या प्रमुख समन्वयक सीए ऋता चितळे व सीए रेखा धामणकर यांनी दिली. 

ऋता चितळे म्हणाल्या, ‘या परिषदेत सीए व्यवसायाशी संबंधित सर्व महत्वपूर्ण मुद्द्यांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. सीए व्यवसायाची मूल्ये,  नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग व दुरुपयोग, विकसित होणारा सीए व्यवसाय अशा विभिन्न विषयांवर भर दिला जाणार आहे. या परिषदेला ‘कमिटी फॉर कपॅसिटी बिल्डिंग ऑफ मेंबर्स ऑफ प्रॅक्टिस ऑफ आयसीसीआय’चे अध्यक्ष सीए केमिशा सोनी, उपाध्यक्ष सीए निहार जांबुसरिया, आयसीएआय पुणेचे चेअरमन सीए आनंद जाखोटिया, सीए एस. बी. झावरे, सीए तरुण घिया, सीए अनिल भंडारी, सीए धीरजकुमार खंडेलवाल, सीए मंगेश किनारे आदी उपस्थित असणार आहेत.’

‘पहिल्या सत्रामध्ये ‘नियमित लेखापरीक्षण ते न्यायवैद्यक लेखापरीक्षणाची बदलती भूमिका’, दुसऱ्या सत्रात  मॉक ट्रिब्युनल्स, सरावातील महत्वपूर्ण तंत्रज्ञान या विषयावर तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभणार आहे. महिला सदस्य आणि सीए फर्म यांच्यामध्ये सेवेदरम्यान निर्माण होणारी दरी कमी करण्यासाठी विशेष मार्गदर्शन करण्यात येईल. दुसऱ्या दिवशी संशोधन प्रबंध सादरीकरण करण्यात येईल. ‘जोखीम व्यवस्थापन’ या विषयावर सीए गुरुनंदन सानवल मार्गदर्शन करणार आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांच्या चर्चासत्र आणि त्यांचे  सत्कारदेखील करण्यात येणार आहेत’, असे धामणकर यांनी नमूद केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link