Next
हत्तींशी संवाद आणि गिधाड संवर्धनाविषयी मार्गदर्शन
ठाण्याच्या बा. ना. बांदोडकर महाविद्यालयात कार्यशाळा
दत्ता पाटील
Monday, August 13 | 05:47 PM
15 0 0
Share this storyठाणे :
हत्तींशी संवाद कसा साधावा, त्यांची देहबोली कशी ओळखावी, याबाबतचे रंजक अनुभव ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या बा. ना. बांदोडकर विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नुकतेच ऐकायला मिळाले. गेली २० वर्षे हत्तींवर संशोधन करून त्यांच्याशी संवाद साधण्याची अनोखी कला अवगत केलेले हत्तीमित्र आनंद शिंदे यांनी हत्तींच्या एक महिन्याच्या पिल्लांपासून ते मोठ्या हत्तिणीबरोबरही संवाद करताना काय काय कल्पना वापरल्या, याबद्दलचे मनोरंजक व तितकेच माहितीपूर्ण विवेचन करून विद्यार्थ्यांना भारावून टाकले. 

महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र व पर्यावरणशास्त्र विभागातर्फे जानेवारीमध्ये होणाऱ्या ‘इकॉलॉजी, इथॉलॉजी अँड एन्व्हायर्न्मेंट मॅनेजमेंट’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे. या परिषदेकरिता विद्यार्थ्यांची तयारी होण्याच्या दृष्टीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. माधुरी किरण पेजावर यांनी या परिषदेच्या आयोजनाचे महत्त्व विशद केले. पहिल्या सत्रात कार्यशाळेचे वक्ते आनंद शिंदे यांनी ‘हत्तींशी संवाद’ या विषयावर माहिती दिली. यावेळी त्यांनी हत्तींशी संवाद कसा साधावा, त्याची देहबोली याबाबत आपले अनुभवही सांगितले. या कार्यशाळेतील दुसरे वक्ते म्हणजे सी-स्केप संस्थेचे प्रमुख आणि गिधाड अभ्यासक प्रेमसागर मिस्त्री हे होते. त्यांनी ‘गिधाड संवर्धन’ याबाबत माहिती सांगितली. गिधाड संवर्धन करताना असलेल्या आव्हानांबद्दलही त्यांनी सांगितले. १८-१९ वर्षांपूर्वी सापडलेल्या एका गिधाडांच्या जोडीपासून वाढत गेलेली गिधाडांची संख्या आता शंभरपेक्षा जास्त झाली आहे. दर वर्षी ही गिधाडे महाडजवळ चिरगावच्या जंगलात घरटी बांधतात व पिल्लांना जन्म देतात, असे मिस्त्री यांनी सांगितले. हे ऐकून सर्वांनाच आनंद झाला. मेलेल्या जनावरांवर ताव मारणाऱ्या या पक्ष्यावर प्रेम करून त्यांचे संवर्धन करणाऱ्या या युवकाचे सर्वांनी कौतुक केले. 

या कार्यशाळेतील दोन्ही व्याख्याने पर्यावरणविषयक जागृती करणारी व मानवी जीवनाचा वन्यजिवांशी संपर्क चांगल्या पद्धतीने होण्याच्या दृष्टीने उपयुक्त होती. या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच आगामी काळात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता वाढीला लागली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link